AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी काय खावे? माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी दिला महत्वाचा सल्ला

तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर स्वतःला उपाशी ठेवणे गरजेचे नाही. दीर्घकाळ तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार आणि शिस्त गरजेची आहे. वजन कमी करण्यास कोणत्या गोष्टी फायद्याच्या आहेत याची माहिती डॉ. श्रीराम नेने यांनी शेअर केली आहे.

Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी काय खावे? माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी दिला महत्वाचा सल्ला
Dr. Shriram Nene health advice
| Updated on: Jun 30, 2026 | 11:00 AM
Share

Dr Shriram Nene Weoight Loss Tips: हल्ली सर्वजण हेल्थ कॉन्शस झालेले दिसत आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे फॅन्सी डाएटचा वापर करत असून त्याचे स्वतंत्र साईड इफेक्ट देखील असतात. परंतू बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पतीन डॉ.श्रीराम नेने यांची मत मात्र वेगळे आहे. डॉ.नेणे सोशल मीडियावर नेहमी आरोग्य आणि फिटनेस संदर्भात टीप्स देत असतात. त्यांच्या मते वजन कमी करणे म्हणजे खाणे-पिणे सोडणे असे बिलकूल नाही.

फिटनेसचा अर्थ एक अशी लाईफस्टाईल स्वीकारणे जी दीर्घकाळापर्यंत काम करेल आणि भविष्यात शरीराला कोणत्याच अडचणीत आणणार नाही. वजन कमी करण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती डॉ. श्रीराम नेने यांनी दिली आहे.

शॉर्ट-टर्म गोल्सपासून दूर राहा

आजकाल अनेक लोक वजन कमी करण्यासाठी खूप घाई करतात. उदाहरणार्थ ३० दिवसात १० किलो वजन कमी करण्याचे ध्येय ठेवणे वा तीन महिन्यात २० किलो वजन कमी करणे आदी. अशा प्रकारचे शॉर्टटर्म्स गोल नेहमीच धोकादायक असतात असे डॉ. नेणे यांनी म्हटले आहे.वजन कमी करण्यासाठी शरीराला हळूहळू सवय लावायला हवी.तुमचे लक्ष्य लॉर्ग टर्म असायला हवे. कोणताही क्रॅश डाएट प्रोग्रॅम तुमचा काही आठवड्यात तुमचे अवसान गाळतो.वजन कमी करण्याची चांगला मार्ग म्हणजे स्वत:च्या कॅलरीवर कायम लक्ष ठेवणे होय असेही डॉ.श्रीराम नेणे यांनी म्हटले आहे.

तुमच्या भूकेपेक्षा रोज २०० ते ४०० कॅलरी कमी खाणे तुम्हाला कॅलरी डिफिसिटमध्ये राखते आणि हा वजन कमी करण्यासाठीची शास्रशुद्ध पद्धत आहे.

काय खावे आणि काय खाऊ नये ?

डाएट संदर्भात टीप्स देताना डॉ.नेने सांगतात की संपूर्णपणे कार्ब्स बंद करणे ही काही समजदारी नाही. कारण यामुळे शरीरातील एनर्जी कमी होते आणि तुम्हाला कमजोर जाणवू शकते. याच्या जागी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्ब्सची निवड करु शकता.

डाएटमध्ये होल ग्रेन, नट्स आणि भरपूर प्रोटीनचा समावेश करा. जर तुम्ही प्रवासात असाल तर स्वत:च्या सोबत शेंगदाण्यासारखे हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवू शकता. जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड पासून दूर राहाणे गरजेचे असते. कधीतरी तुमच्या आवडीचे जेवण खाण्यात काहीच हरकत नाही, परंतू कॅलरीवर लक्ष ठेवा असे ते म्हणतात.

केवळ या गोष्टींची काळजी घ्या –

वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये राहाल तर वजन लवकर कमी होईल. हेल्दी डेफिसिट क्रिएट करण्यासाठी तुम्ही फिजिकल एक्टिव्हीटी देखील करु शकता. उदा. जिमला जाणे, पोहणे, धावणे, सायकलिंग करणे आदी. परंतू नेहमी ध्यानात ठेवा तुमच्या शरीराला ओव्हर ट्रेन करु नका. रिकव्हरी देखील गरजेची असते, अन्यथा त्याचेही तोटे आहेत.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती