मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे

मधमाशांच्या हल्ला हा भयंकर असतो. प्रसंगी त्यांचा हल्ला जीवावर देखील बेतू शकतो. त्यामुळे जंगलात जाताना मधांच्या पोळ्यापासून सावधान रहायला हवे. मधमाशांच्या डंख जीवघेणा असू शकतो. मधमाशापासून वाचण्यासाठी ग्रामीण असो वा शहरी भाग मधमाशांचा हल्ल्याचे प्रकार सर्वत्र घडत असतात.

मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
BEE ATTACKImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 10:22 PM

छत्तीसगडमधील जगदलपूरजवळील बिलोरी गावात बुधवारी मधमाशांनी गावकऱ्यांवर हल्ला केला. या मधमाशांच्या हल्ल्यात जवळपास 30 गावकरी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गावातील जत्रेत हा प्रकार घडला. जत्रेवेळी पूजा करताना झालेल्या प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी गावकऱ्यांवर मोठा हल्ला केला. त्यामुळे जत्रेत चेंगराचेंगरी झाली. मधमाश्यांच्या हल्ल्याच्या बातम्या नेहमीच ऐकायला येत असतात. मधमाशांनी जर हल्ला केला तर आपण काय करावे आणि त्यांच्यापासून कसे सतर्क राहावे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

खेड्यापाड्यात झाडांवर किंवा शहरांमधील इमारतींच्या मधोमध मधमाशांनी आपले पोळे तयार केले की आपण त्याची तक्रार नगर पालिका किंवा ग्रामपंचायतीला करत असतो. परंतू जर मधमाशांनी अचानक हल्ला केला तर आपल्याला त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी तरी घ्यावी लागते. मधमाशांमुळे आपले प्राणही जाऊ शकतात. त्यामुळे अशा संकटाच्या वेळी काय करायचे हे माहीती असणे गरजेचे आहे. आपण अनेकदा आपण इंटरनेटवरून किंवा आपल्या मित्रमंडळी किंवा ज्येष्ठांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून असतो, पण इंटरनेटवरही त्याच्या मधमाशांच्या हल्ल्याच्या वेळी नेमकी काय करायचे याची फारशी योग्य माहिती दिलेली नसते. अशा परिस्थितीत संरक्षणासाठी आणि मधमाशांचा दंश झाल्यास उपचारासाठी काय करावे याची माहीती पाहूयात…

धोका जाणवताच दूर जा

मधमाशा कधीही थेट आणि प्रथम हल्ला करत नाहीत. जर मधमाशी तुमच्या डोक्यावर घोंगाऊ लागल्या तर त्या हल्ला करणार हे गृहीत धरुन सावध रहा आणि तेथून पळ काढा. कारण काही वेळातच मधमाशांचा मोठा थवा या भागावर हल्ला करू शकतो. जेव्हा मधमाशा हल्ला करतात तेव्हा त्यांची संख्या शेकडोंनी असते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्याशी मुकाबला करू शकत नाही. त्यामुळे पहिली पायरी म्हणजे ताबडतोब सुरक्षित स्थळी पळून जावे असे यूएस डिपार्टमेंट ऑफ इंटिरियर नॅशनल पार्क सर्व्हीसच्या सागुआरो नॅशनल पार्कमधील मार्गदर्शकांनी म्हटले आहे.

वस्तू किंवा दगड मारु नका

लोक अनेकदा मधमाशांचा आवाज ऐकताच त्यांना हातांनी हाकलण्याचा प्रयत्न करतात. नॅशनल पार्कच्या गाईडच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही जोरात हात फिरवता तेव्हा मधमाश्या त्यांच्या राणी मधमाशीला वाचवण्यासाठी लगेच तुमच्यावर तुटून पडतात. त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यापासून दूर राहा. त्याला दगड किंवा काठीने मारु नका किंवा तेथे तीव्र अत्तर किंवा सेंट, अथवा धूर करु नका असे एबीसी न्यूजने म्हटले आहे.

चेहऱ्याचे आधी रक्षण करा

जेव्हा जेव्हा तुमच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला तेव्हा लगेचच तुमच्या हातांनी चेहरा झाकण्याचा प्रयत्न करा. मधमाशा सामान्यतः तुमचे तोंड, नाक आणि डोळे यांसारख्या शरीरावरील नाजूक अवयवांना हल्ला करतात. त्यामुळे तो भाग सुजतो. आणि काळा देखील पडतो. चेहरा आणि नाक डोळे हा शरीरातील अतिशय संवेदनशील भाग असल्याने त्याचे आधी रक्षण करायला हवे असे एबीसी न्यूजने म्हटले आहे.

पाण्यात उडी मारू नका

मधमाशांपासून वाचण्यासाठी अनेकदा लोक पाण्यात उडी मारतात असे अनेकवेळा दिसून आले आहे. तज्ञांच्या मते, असे करू नये. यामुळे तुम्हाला मधमाशांपासून वाचता येणार नाही, शिवाय पाण्यात बुडण्याचा देखील धोका असतो. त्यामुळे पाण्यात उडी मारणे हा काही तितकासा भरवशाचा पर्याय नाही. तुम्हाला मधमाशांनी डंख मारल्यानंतर प्रचंड वेदना होता. त्या मधमाशीच्या शरीराच्या पाठचा कुसळासारखा काटा तिने तुमच्या त्वचेत घुसविलेला असतो. तो लगेच तुमच्या शरीरातून काढून टाकण्याचा प्रयत्न करा, कारण तो विषारी असू शकतो. जर तुम्हाला अनेक डंख मारले असतील तर ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार करा अन्यथा ते धोकादायक ठरू शकते.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.