AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WHO ने भारतातील या दोन कफ सायरपबद्दल दिला इशारा, तुम्ही राहा सतर्क

मरीन कंपनीनं या औषधाच्या गुणवत्तेबाबत आरोग्य संघटनेला शास्वती दिली नाही. उजबेकिस्तानच्या बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर भारताच्या आरोग्य मंत्रालयानं या औषधाच्या विक्रीवर निर्बंध लावले.

WHO ने भारतातील या दोन कफ सायरपबद्दल दिला इशारा, तुम्ही राहा सतर्क
| Updated on: Jan 12, 2023 | 5:48 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने बुधवारी भारतीय औषध कंपनी मरीन बायोटेकच्या दोन कफ सायरबबद्दल इशारा दिला. संघटनेनं मुलांसाठी या कफ सायरबचा वापर करू नये, असा इशारा दिला. WHO ने म्हटलं की, कंपनीनं दोन कफ सायरप गुणवत्तेच्या कसोटीत उरतली नाही. त्यामुळं या कफ सायरपच्या विक्रीवर पूर्णपणे निर्बंध आणण्यात आले आहेत. उजबेकिस्तानच्या १९ बालकांचा मृत्यू या कंपनीनं तयार केलेल्या कफ सायरपशी संबंधित असल्याचं म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेनं कंपनीची औषध ambronol सायरप आणि    DOK-1 Max सायरप बाजारात विक्रीपासून थांबविण्यासाठी सांगण्यात आलंय. ही औषधी तयार करणाऱ्या कंपनीचे कार्यालय नोएडा सेक्टर ६७ मध्ये आहे.

या घटकाची मात्रा जास्त

उजबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयानं बालकांच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे. दोन्ही कफ सारयपची तपासणी केली. यात दोन्ही औषधींमध्ये डाईथिलीन ग्लाईकोल आणि इथिलीन ग्लाईकोलची मात्रा जास्त दिसून आली. यामुळं बालकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मंत्रालयानं सांगितलं की, श्वासाच्या आजाराशी झुंज देणाऱ्या २१ बालकांनी या औषधांचं सेवन केलं होतं. त्यापैकी १९ बालकांचा मृत्यू झाला.

औषध कपंनीची लायसन रद्द

मरीन कंपनीनं या औषधाच्या गुणवत्तेबाबत आरोग्य संघटनेला शास्वती दिली नाही. उजबेकिस्तानच्या बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर भारताच्या आरोग्य मंत्रालयानं या औषधाच्या विक्रीवर निर्बंध लावले. गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारनं या औषध कंपनीचे लायसन रद्द केले.

मरीन बायोटेक उजबेकिस्तानमध्ये २०१२ पासून रजिस्टर्ड आहे. तेव्हापासून तिथं ही कंपनी औषध विक्री करते. भारतात या कंपनीच्या औषधी विक्री केल्या जात नाही.

गेल्या आठवड्यात उजबेकिस्तानमधील १९ बालकांच्या मृत्यूनंतर कफ सायरपशी संबंधित मृत्यूची तपासणी करणाऱ्या कंपनीनं चार जणांना अटक केली. यापूर्वी गाम्बिया येथे कफ सायरपमुळं ७० बालकांच्या मृत्यूची घटना समोर आली होती.

गाम्बियाच्या संसदीय समितीनं या मृत्यूला  दिल्लीतील मेडेन फार्मास्युटिकलकडून तयार झालेली कफ सायरपशी जोडलं होतं. परंतु, कंपनीनं गुणवत्ता चांगली असल्याचं म्हटंलय. भारत सरकारनं औषधाची तपासणी केली. त्यांत कोणतीही अडचण नसल्याचं म्हटलंय.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.