AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पन्नाशीनंतर व्हिटामिन्स D आणि B12 ची गरज का वाढते ? या पदार्थांद्वारे कमतरता पूर्ण करा…

वयाच्या पन्नाशी नंतर शरीर आधी प्रमाणे पोषक तत्वांना सहज शोषून घेऊ शकत नाही. यासाठी योग्य खानपान आणि व्हिटामिन्सवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते.

पन्नाशीनंतर व्हिटामिन्स D आणि  B12 ची गरज का वाढते ? या पदार्थांद्वारे कमतरता पूर्ण करा...
Bone Health
| Updated on: Apr 02, 2026 | 4:01 PM
Share

वाढत्या वयासोबत शरीरावर अनेक बदल दिसू लागतात. हाडाचे मजबूती, स्मरणशक्ती आणि रोग प्रतिकारक शक्ती यांच्यावर मोठा परिणाम दिसून येत असतो. खासकरुन पन्नाशीनंतर शरीर पोषक तत्वांना आधीसारखे सहज शोषून घेऊ शकत नाही, त्यामुळे आहाराकडे आणि पोषक तत्वांकडे नीट लक्ष देणे खास गरजेचे आहे. व्हिटामिन्स भलेही कमी प्रमाणात असले तरी शरीराला नीट चालवण्यात त्यांची भूमिका मोठी असते. योग्य व्हिटामिन्स मिळाल्याने न केवळ आजारांचा धोका कमी होतो, तर वय वाढल्यानंतरही शरीर एक्टिव्ह आणि फिट राहाते.

व्हिटामिन्स डीची गरज

knowridge च्या अहवालानुसार विचार करता आधी व्हिटामिन्स डीचा विचार केला असता. यास सनशाईन व्हिटामिन्स देखील म्हटले जाते. हे शरीरात तेव्हा बनते जेव्हा त्वचा उन्हाच्या संपर्कात येते. परंतू वय वाढल्यानंतर शरीराची ही क्षमता कमी होत जाते. त्यामुळे वयस्कांमध्ये याची कमतरता जास्त जाणवते. व्हिटामिन्स डीचे मुख्य काम कॅल्शियमचे शोषण करणे हे असते. कॅल्शियम हाडांना मजबूत करण्यासाठी गरजेचे असते. याच्या कमतरतेने हाडे कमजोर होऊ शकतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. संशोधनानुसार पुरेसे व्हिटामिन घेतल्याने ऑस्टियोपोरोसिसची जोखीम कमी होऊ शकते.

कॅल्शियम आणि व्हिटामिन्स B12 ची गरज

कॅल्शियम देखील पन्नाशीनंतर गरजेचे असते. वयासोबत हाडांचे घनत्व कमी होत जाते. आणि महिलांना मोनोपॉझ नंतर ही प्रक्रिया वेगवान होते. दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्यात कॅल्शियम चांगले असते. याशिवाय व्हिटामिन्स बी-१२ चे महत्व देखील खास असते. हे मेंदूचे कार्य व्यवस्थित करते. आणि तांबड्या पेशींच्या निर्मितीत मदत करते. वय वाढल्यानंतर शरीरात बी १२ ची शोषण कमी होत जाते. ज्यामुळे थकवा, कमजोरी आणि विस्मृतीशी संबंधित समस्या होऊ शकतात.

व्हिटामिन्स C आणि E गरज

व्हिटामिन्स सी इम्युन सिस्टीमला मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावते. हे शरीराच्या डागडुजीला मदत करते. त्वचेला आरोग्यदायी बनवते. संत्री, स्ट्रॉबेरी, किवी आणि ब्रोकोली सारख्या खाद्य पदार्थ व्हिटामिन्स सीचा पुरवठा करतात. व्हिटामिन ई एक शक्तीशाली एंटीऑक्सिडेंट असून ते पेशींना नुकसानी पासून वाचवते. तसेच व्हिटामिन्स के रक्ताच्या गुठळ्या बनने आणि हाडांना मजबूत करण्यास मदत करते. पालक, ब्रोकोली सारख्या भाज्यात हे खूप मोठ्या प्रमाणात आढळते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?