.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाढत्या वयाबरोबर शरीर देते हे संकेत… वेळीच योग्य आहाराकडे लक्ष द्या…

वाढत्या वयासोबत आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. अनेक घटकांची शरीराला कमतरता जाणवल्यास शरीरात त्याची काही लक्षणे दिसून येतात. गुडघेदुखी, कंबरदुखी, त्वचेला सुरकुत्या पडणे आदी वाढत्या वयातील समस्या अनेकांना सहन कराव्या लागत असतात. परंतु वाढत्या वयाला अनुसरून योग्य आहार ठेवल्यास या समस्यांचा कमी त्रास होतो.

वाढत्या वयाबरोबर शरीर देते हे संकेत... वेळीच योग्य आहाराकडे लक्ष द्या...
वाढत्या वयाबरोबर व्याधीही वाढतात. त्यामुळे सकस आहार महत्वाचा आहे.
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jan 17, 2022 | 4:44 PM
Share

मुंबई : वय वाढते तसे विविध व्याधी जडत जातात. शरीरात अनेक बदल होतात. कोणाला याचा त्रास कमी होता तर कुणाला कमी वयातच अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असते. शरीरातील हे बदल बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते, की शरीरातील कुठल्या ना कुठल्या कमतरतेमुळे वाढत्या वयासोबतची लक्षणे त्रस्त करतात. वेळीच शरीरातील लक्षणांवर उपाय योजना केल्यास वाढत्या वयातही आपण निरोगी सुदृढ आयुष्य जगू शकतो. जसजसे म्हातारपण (aging) जवळ येते तसतसे माणसाचे शरीरही कमजोर होते. अशा परिस्थितीत आवश्यक पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. सर्वच जण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, खरं तर शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (healthy) राहिलो तर म्हातारपणही खूप उशिरा येते. म्हातारपणामुळे आपल्या सर्वांच्या आत अनेक प्रकारचे शारीरिक बदल होऊ लागतात. शरीराला तंदुरुस्त ठेवणारे नैसर्गिक (natural) घटकही कमी होऊ लागतात. यामुळेच आपण आपल्या सकस आणि पौष्टिक आहाराची (nutrients) पूर्ण काळजी घेतली पाहिजे. सकस आहाराकडे लक्ष न दिल्यास स्नायू कमकुवत होणे, हाडे कमजोर होणे आदी समस्या निर्माण होत असतात. वाढत्या वयासोबत केस लवकर पांढरे होण्यास सुरुवात होते. अशा वेळी आपल्या शरीराला कोणत्या घटकांची अधिक आवश्यकता असते, हे जाणून घेणे महत्वाचे असते.

व्हिटॅमिन बी 12 आणि 6

‘व्हिटॅमिन बी 12’ हे शरीराला रक्त आणि चेतापेशी तयार करण्यात मदत करते. मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थातून हे सहज उपलब्ध होते. तुम्ही मांसाहारी नसाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे तसेच पूरक पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. याशिवाय ‘व्हिटॅमिन बी 6’ जंतूंशी (Germs) लढण्यासाठी तसेच शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी फायद्याचे आहे, यामुळे वाढत्या वयातही स्मरणशक्तीही चांगली राहण्यास मदत होत असते.

कॅल्शियम आणि मॅग्नेशियम

आपण सर्वांना माहिती आहे, कॅल्शियममुळे हाडे आणि दात मजबूत होतात. म्हातारपणी शरीराला कॅल्शियमची खूप गरज असते, अनेक वेळा डॉक्टरांकडून कॅल्शियमच्या गोळ्यादेखील देण्यात येत असतात. दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे आहारात दूध, दही इत्यादींचा समावेश केला पाहिजे. यासोबतच शरीराला मॅग्नेशियमचीही खूप गरज असते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही स्थिर राहते. मॅग्नेशियमसाठी काजू, बिया आणि पालेभाज्या आदींचा आहारात समावेश असावा.

ओमेगा 3 s आणि व्हिटॅमिन डी

शरीराला ‘ओमेगा 3 s’ फॅटी ॲसिडस्’ हे स्वतः कसे बनवायचे माहित नसते. मेंदू, चेतापेशी आणि शुक्राणू पेशींसाठी ते आवश्यक असते. वाढत्या वयातील अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि अंधत्व टाळण्यासाठी शरीरात ‘ओमेगा 3’ असणे आवश्यक आहे, यासाठी फॅटी मासे, अक्रोड यांचा रोजच्या आहारात समावेश करावा. याशिवाय सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘व्हिटॅमिन डी’ हे वृद्धापकाळात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्डिन, मॅकरेल इत्यादी माशांचा आहारात समावेश असावा.

झिंक आणि पोटॅशियम

झिंक आपल्यास वासाची आणि चवीची क्षमता वाढवते, ते शरीरातील संसर्ग आणि इतर आजारांशी लढण्याची क्षमताही वाढवत असते, यातून दृष्टी सुधारते. ही कमतरता भरून काढण्यासाठी, सकस नाश्ता घेतला पाहिजे. पोटॅशियम हृदय, स्नायू, मूत्रपिंड आणि मज्जातंतूंसाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता पालक, दूध, केळी इत्यादींच्या सेवनाने भरून निघते.

संबंधित बातम्या :

Corona Cases India : देशात 2 लाख 58 हजार नवे रुग्ण, मृत्यूसंख्येत वाढ झाल्यानं टेन्शन वाढलं

Health Care : कोरफडचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वजनही झटपट कमी होते!

Brinjal | नियमित आहारामध्ये वांगं वापरत असाल तर पच्छाताप होण्याआधीच काही गोष्टी जाणून घ्या!

Follow Us
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!