AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी वजनाचा ध्यास जीवावर बेतला, वेट लॉस शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

तुर्की येथे बॅरिॲट्रिक सर्जरीदरम्यान एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वजन कमी करण्यासाठी बॅरिॲट्रिक सर्जरी ही खूप फायदेशीर मानली जाते, पण त्याचे काही तोटेही आहेत.

कमी वजनाचा ध्यास जीवावर बेतला, वेट लॉस शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
| Updated on: Nov 30, 2022 | 1:40 PM
Share

नवी दिल्ली – जगभरात लठ्ठपणाच्या (obesity) समस्येचा सामना कराव्या लागणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. लठ्ठपणासाठी अनेक कारणं असतात. पौष्टिक आहाराचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे किंवा कित्येक वेळा अनुवांशिक कारणामुळेही एखाद्या व्यक्तीचं वजन वाढून ती लठ्ठ होऊ शकते. आजकाल शस्त्रक्रियेद्वारेही लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो. जाडेपणा कमी करण्यासाठी (weight loss) ज्या सर्जरीची मदत घेतली जाते, त्याला बॅरिॲट्रिक सर्जरी (bariatric surgery) असे म्हणतात.

तसं पहायला गेलं वजन कमी करण्यासाठी बॅरिॲट्रिक सर्जरी ही सुरक्षित मानली जाते, मात्र प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आणि तोटे दोन्ही असतात. त्याचप्रमाणे बॅरिॲट्रिक सर्जरीमुळेही नुकसान होऊ शकते.

तुर्की येथे बॅरिॲट्रिक सर्जरीदरम्यान एका 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना काही काळापूर्वी घडली. 30 वर्षीय ही महिला आयर्लंड मधील डब्लिन येथून आली होती आणि बॅरिॲट्रिक सर्जरी दरम्यान तिला तिचा जीव गमवावा लागला. मात्र या महिलेच्या मृत्यूच्या नेमक्या कारणाचा अद्याप शोध घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बॅरिॲट्रिक सर्जरी म्हणजे नेमके काय आणि त्यादरम्यान कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागू शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

बॅरिॲट्रिक सर्जरी म्हणजे काय ? 

गॅस्ट्रिक बायपास व्यतिरिक्त वजन कमी करण्याच्या इतर शस्त्रक्रियेस शस्त्रक्रियेस बॅरिॲट्रिक सर्जरी किंवा बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया या नावाने ओळखले जाते. या सर्जरीदरम्यान त्या व्यक्तीच्या पचनसंस्थेत काही बदल केले जातात, ज्याच्या मदतीने वजन कमी होते. आहारात बदल, विशिष्ट डाएट किंवा व्यायाम करूनही जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन होत नाही किंवा लठ्ठपणामुळे एखाद्या व्यक्तीला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत बॅरिॲट्रिक सर्जरी केली जाते.

काही सर्जरींमध्ये त्या व्यक्तीची खाण्याची मर्यादा केली जाते, म्हणजेच थोडंस खाल्याने त्या व्यक्तीचे पोट भरल्याची जाणीव होते. तर इतर काही शस्त्रक्रियांदरम्यान (त्या व्यक्तीच्या) शरीरातील पोषकद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होते. तर काही शस्त्रक्रियांमध्ये या दोन्ही गोष्टी केल्या जातात. तसं पहायला गेलं तर बॅरिॲट्रिक सर्जरी अनेक पद्धतीच्या असतात, तरीही सामान्यत: सर्जन्स हे तीन गोष्टींचा उपयोग करतात – रॉक्स-एन-वाय गॅस्ट्रिक बायपास, व्हर्टिकल स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टॉमी आणि लेप्रोस्कोपिक ॲडजस्टेबल गॅस्ट्रिक बँडिंग.

ज्या लोकांचे वजन खूप जास्त त्यांना बॅरिॲट्रिक सर्जरीच्या माध्यमातून मदत मिळते, मात्र काही प्रकरणांमध्ये बॅरिॲट्रिक सर्जरीचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. या सर्जरीचा दीर्घकाळापर्यंत फायदा मिळावा यासाठी सर्जरीनंतर संबंधित व्यक्तीला तिच्या जीवनशैलीत अनेक बदल करावे लागतात.

कधी केली जाते बॅरिॲट्रिक सर्जरी ?

लठ्ठपणामुळे अनेक प्रकारच्या गंभीर आजारांना सामोरे जाव्या लागणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी बॅरिॲट्रिक सर्जरी केली जाते. त्या समस्या खालीलप्रमाणे –

1) हृदयाशी संबंधित आजार 2) स्ट्रोक 3) हाय ब्लड प्रेशर / उच्च रक्तदाब 4) नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग 5) स्लीप ॲपनिया 6) टाइप 2 डायबिटीज

लठ्ठपणाचा त्रास असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची बॅरिॲट्रिक सर्जरी किंवा शस्त्रक्रिया केली जात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. ही सर्जरी करण्यासाठी काही वैद्यकीय निकष (medical criteria) पूर्ण करावे लागतात. जेव्हा एखाद्या लठ्ठ व्यक्तीचे वजन डाएट किंवा व्यायामाच्या माध्यमातूनही कमी होत नाही, तेव्हा ही सर्जरी केली जाते.

बॅरिॲट्रिक सर्जरीमध्ये उद्भवू शकतात हे धोके !

प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे किंवा दुष्परिणाम असतात, त्याचप्रमाणे बॅरिॲट्रिक सर्जरीचेही काही दुष्परिणाम असू शकतात. हेल्थलाइन नुसार, बॅरिॲट्रिक सर्जरी केल्यानंतर आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बॅरिॲट्रिक सर्जरी दरम्यान किंवा सर्जरीनंतर खाली नमूद केलेल्या मुद्यांपैकी काही जोखीम अथवा त्रास जाणवू शकतो.

– अति रक्तस्त्राव होणे

– इन्फेक्शन

– भूल (ॲनेस्थिशिया) देण्याचा उलट परिणाम होणे.

– रक्ताची गुठळी तयार होणे

– श्वास घेण्यास त्रास होणे

– काही प्रकरणांमध्ये मृत्यू होऊ शकतो.

बॅरिॲट्रिक सर्जरीनंतर काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये लोकांमध्ये ही लक्षणेही दिसू शकतात : 

– आतड्यांसंबंधी समस्या

– स्टोन

– हर्निया

– ब्लड शुगर लेव्हल कमी होणे

– कुपोषण

– अल्सर

– उलटी होणे

– ॲसिड रिफ्लेक्स किंवा ॲसिडिटीचा त्रास होणे

– पुन्हा सर्जरी करण्याची गरज उद्भवणे

– अगदी दुर्मिळ प्रकरणांत मृत्यू होण्याचा धोका.

मात्र डॉक्टरांचा असा विश्वास आहे की या सर्जरीमध्ये कोणतेही दुष्परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. सबंधित व्यक्तीने सर्जरीनंतर त्याची जीवनशैली सुधारणे आवश्यक ठरते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.