महिलांनी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्यावे!
म्हातारपणी निरोगी राहण्यासाठी महिलांनी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. महिला स्वत:ला कसे फिट ठेवू शकतात आणि त्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.

मुंबई: वाढत्या वयाबरोबर महिलांना अनेक समस्या येऊ लागतात, अशा वेळी महिलांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण म्हातारपणी निरोगी राहण्यासाठी महिलांनी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. महिला स्वत:ला कसे फिट ठेवू शकतात आणि त्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं हे आम्ही तुम्हाला इथे सांगतो.
महिलांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावे
लोह
महिलांच्या शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असते. महिलांना मासिक पाळी येते ज्यामुळे त्यांना अशक्तपणा येऊ लागतो. रक्त पेशी निरोगी ठेवणे हे लोहाचे काम आहे. अशा महिलांनी पालक, डाळी आणि शेंगांच्या भाज्या खाव्यात.
कॅल्शियम
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता भासते. ज्यामुळे हाडांवर परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला हवं. त्यासाठी आहारात दूध, हिरव्या भाज्या, ड्रायफ्रूट्स खायला हवेत. याशिवाय थोडा वेळ उन्हात बसावे.
ओमेगा -3
ओमेगा -3 ची कमतरता बहुतेक स्त्रियांमध्ये दिसून येते. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या कार्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. ओमेगा -3 चे सर्वाधिक प्रमाण माशांमध्ये आढळते. पण जर तुम्ही मासे खात नसाल तर सूर्यफूल आणि भोपळ्याच्या बिया खाऊ शकता. याशिवाय तुम्ही अक्रोडही खाऊ शकता.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी देखील शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की फ्लॉवर आणि ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन डी असते. याचे सेवन करण्याबरोबरच महिलांनी सकाळी उन्हात थोडा वेळ बसावे. कारण शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)
