AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women: महिलांनी रोज करावी ‘ही’ 3 योगासने, जिमला न जाताच मिळेल स्लिम लूक!

अनेक महिलांना इच्छा असूनही जिम किंवा योगा सेंटरमध्ये जाणं शक्य नसतं. अशावेळी जिमला न जाता काही आसने सहज घरी करता येतात. ही योगासने तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्त करतील तसेच तंदुरुस्त राहण्यासही मदत करतील.

Women: महिलांनी रोज करावी 'ही' 3 योगासने, जिमला न जाताच मिळेल स्लिम लूक!
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 14, 2022 | 1:53 PM
Share

Yogasana for women: योगासने किंवा व्यायाम (yogasana or exercise) करणे हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. नियमितपणे योगासने आणि व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त होते, आणि आजारांना (good for body) रोखता येते. यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो. कामातील व्यस्ततेमुळे किंवा घरातून बाहेर पडता न आल्यामुळे अनेक महिलांना जिममध्ये किंवा योग केंद्रात जाणे शक्य होत नाही. अनेक महिलांना इच्छा असूनही त्यांना जिमला (gym) जाता येत नाही. त्यामुळे त्यांना आरोग्यासंदर्भात तडजोड करावी लागते. मात्र, तुम्हाला हवे असल्यास घरीच राहून काही खास योगासनांचीही मदत घेता येईल. ज्यामुळे तुम्हाला निरोगी व फिट (fit) राहता येईल. उत्तर प्रदेशमधील लखनऊ स्थित किंग जॉर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ऑर्थोपेडिक सर्जरी विभागातील क्लिनीकल योग प्रशिक्षक डॉ. वंदना अवस्थी यांच्याकडून काही योगासनांबद्दल जाणून घेऊया.

ही आसने केल्याने तुम्ही स्वस्थ तर रहालच पण अनेक आजारांपासून बचाव करता येईलल. तसं पहायला गेलं कोणताही व्यायाम किंवा योगासन सकाळच्या वेळेस करणे उत्तम ठरते. मात्र जर तुमच्याकडे सकाळी वेळ नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही हे करू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की, कोणताही व्यायाम अथवा योगासन हे जेवणानंतर लगेच करू नये, त्यामध्ये किमान 2 तासांचे अंतर असावे. तसेच योगासने करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

चक्की चलासन

हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीवर योगा मॅट घेऊन त्यावर बसावे. आपले दोन्ही पाय पुढे पसरवून त्यामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. या काळात पाठीचा कणा सरळ ठेवावा. आता हात सरळ जमिनीला समांतर ठेवून दोन्ही हाताची बोटे एकत्र अडकवा. नंतर हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) म्हणजेच उजवीकडून डावीकडे गोल फिरवा. यानंतर हीच क्रिया विरुद्ध दिशेने पुन्हा करा. सुरुवातीला एक-दोन मिनिटे हे योगासन करा आणि नंतर हळूहळू वेळ वाढवा. या योगासनामुळे पीसीओडीच्या समस्येत आराम मिळतो. ज्यामुळे अनियमित मासिक पाळी हळूहळू नियमित होऊ लागते तसेच वेदना आणि पेटके दूर होतात. इतकंच नाही तर मानसिक ताण कमी होतो व लठ्ठपणापासून मुक्ती मिळण्यासही मदत होते.

chakki chalasan

चक्की चलासन

फुलपाखरू आसन

फुलपाखरू आसन करण्यासाठी योग मॅटवर सूर्याकडे तोंड करून निवांत मुद्रेत बसावे. मग आपले दोन्ही पाय पुढे पसरवून गुडघ्यात वाकवा, ज्यामुळे दोन्ही पायांचे तळवे एकमेकांशी जोडले जातील भेटतात. आता दोन्ही हातांनी पायांचे तळवे घट्ट पकडून पाय वरखाली हलवा. सुरुवातीला एक-दोन मिनिटे हे आसन करा, नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार त्याचा वेळ वाढवा. बटरफ्लाय आसन केल्याने पीसीओडीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. तसंच पाठदुखी आणि स्नायूंचा ताणही दूर होतो. इतकंच नव्हे तर गर्भधारणेच्या तीन महिन्यांनंतरही हे आसन करता येतं. या आसनामुळे प्रसूती सुलभ होण्यासही मदत होते. फुलपाखरू आसने नियमितपणे केल्याने रक्ताभिसरणही सुधारते.

butterfly yogasan

फुलपाखरू आसन

दंडासन

दंडासन करण्यासाठी प्रथम जमिनीवर बसून पाय समोरच्या बाजूला पसरवून एकत्र जोडावेत. नंतर दोन्ही हात खांद्याच्या बरोबरीने आपल्या मांडीजवळ थेट जमिनीवर ठेवा. यावेळी पाठीचा कणा ताठ ठेवावा. आता दोन्ही पायाची बोटे आपल्या दिशेने खेचून काही सेकंद धरून ठेवा आणि नंतर सैल सोडा. आपल्या क्षमतेनुसार, दहा ते पंधरा वेळा ही क्रिया पुन्हा करा. हे आसन कोणत्याही वयातील आणि स्थितीतील महिला सहज करू शकतात. दंडासनामुळे खांद्यातील ताणाची समस्या कमी होते. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत होतात. तसेच स्नायू मजबूत होतात आणि पचनशक्ती वाढते.

dandasana

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.