टोमॅटोपासून ते सोयाबीनपर्यंत… गुडघेदुखीच्या वेदना वाढवू शकते ‘या’ पदार्थांचे सेवन

गुडघेदुखीने अनेकदा लोक त्रस्त असतात. अशा स्थितीत काही पदार्थांचे सेवन केल्याने हा त्रास वाढू शकतो. कसे ते जाणून घेऊया.

टोमॅटोपासून ते सोयाबीनपर्यंत... गुडघेदुखीच्या वेदना वाढवू शकते 'या' पदार्थांचे सेवन
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 10:30 AM

नवी दिल्ली : प्रौढांसह आता तरुणवर्गातूनही गुडघेदुखीच्या समस्येची (knee pain) तक्रार करण्यात येत आहे. तसं पाहिलं तर गुडघेदुखीच्या समस्येला अनेक कारणे कारणीभूत असतात. चुकीची जीवनशैली, वाढलेले वजन (weight gain) , दुखापत इत्यादींचा त्यात समावेश असू शकतो. तुम्हालाही तुमच्या गुडघ्यात वेदना जाणवतात का ? हे कदाचित संधीवातामुळेही (joint pain) होऊ शकते. तसेच संधिवात कोणत्याही प्रकारचा असो, काही खाद्यपदार्थांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते.

हो, हे खरं आहे. काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्याने सांध्यामध्ये तेलाची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे ताठरपणा येतो, म्हणजे ताण (stress on knees) येतो. तसेच, काही पदार्थांमुळे कॅल्शियमची (calcium deficiency) कमतरता निर्माण होते, ज्यामुळे गुडघेदुखी वाढू शकते. गुडघेदुखीचा त्रास असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे, ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

गुडघ्यात वेदना होत असतील तर हे पदार्थ खाऊ नयेत

1) टोमॅटो

टोमॅटोसारख्या नायट्रेटयुक्त पदार्थांमुळे गुडघेदुखीचा त्रास वाढू शकतो. यामुळे संधिवातही वाढू शकते. खरंतर, टोमॅटो खाल्ल्याने सांधेदुखी वाढू शकते, कारण यामुळे सांध्यातील अंतर वाढू शकते आणि सूज निर्माण होऊ शकते. म्हणूनच तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर टोमॅटोचे सेवन करणे टाळावे.

2) सोयाबीन

सोयाबीन हे तुमच्या गुडघेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकते. यामुळे आपल्या शरीरातिल युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. ज्यामुळे गुडघेदुखी सुरू होऊ शकते. म्हणून सोयाबीनचे अतीसेवन करणे टाळावे.

3) पास्ता

पास्ता खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. खरंतर, पास्ता हा गव्हापासून बनविला जातो ज्यामध्ये ग्लूटेन असते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. गव्हा व्यतिरिक्त, बार्ली आणि राईमध्ये देखील ग्लूटेन असते, म्हणून आपण हे देखील टाळावे. त्यामुळे त्याऐवजी ब्राऊन राइसचा पास्ता तयार करून तो सेवन करावा.

4) तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ खाल्ल्याने सांधेदुखीत आणखी वाढ होऊ शकते. कारण त्यामुळे गुडघ्यावर अधिक ताण येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, या पदार्थांच्या सेवनाने शरीरातील युरिक ॲसिडची पातळीही वाढते. त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास आणखी वाढू शकतो. म्हणूनच तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नये.

5) अति साखरयुक्त पदार्थ

जेव्हा सांधेदुखीचा प्रश्न येतो तेव्हा फ्रॅक्टोज, सोडा आणि फळे असलेले प्रक्रिया केलेले रस सेवन करणे टाळावे. यामुळे गुडघेदुखी खूप लवकर वाढू शकते आणि तुम्हाला चालणे देखील कठीण होऊ शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....