AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लायदुबई विमान प्रकरणात खळबळजनक वळण, थेट 2 वैमानिक ताब्यात, स्मित मच्छार..

फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. याबाबत मोठी माहिती पुढे येत आहे. स्मित मच्छार याच्यामुळे आज 180 लोक जिवंत आहेत. यादरम्यान अजून दोन पायलटला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचे समतंय.

फ्लायदुबई विमान प्रकरणात खळबळजनक वळण, थेट 2 वैमानिक ताब्यात, स्मित मच्छार..
Smit Machchhar Flydubai
| Updated on: Oct 14, 2026 | 6:15 PM
Share

फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. को पायलटने भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. त्यातच गंभीर जखमी असताना भारतीय पायलटने 180 लोकांचा जीव वाचवला. ओमानी पायलटने त्यांच्यावर हल्ला केल्यानंतरही स्मित मच्छार यांनी हार मानली नाही. ओमानी पायलटला तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानाला कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅश करायचे होते. तेल अवीव विमानतळापर्यंत आपण पोहोचू शकणार नसल्याचे लक्षात येताच या पायलटने थेट रेगिस्तानमध्ये हे विमान क्रॅश करण्याचा निर्णय घेतला. पण स्मित मच्छार याने तो कट उधळून लावला. युएईच्या तपास यंत्रणांकडून ओमानी पायलटची कसून चाैकशी केली जात आहे. चाैकशीत त्याच्याकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. फ्लायदुबईमध्ये नोकरी करण्याचे कारणच त्याने सांगितले की, तेल अवीवकडे थेट विमान जात असल्यानेच आपण ही एअरलाईन्स जॉईन केली.

ओमानी पायलट खुलासे करत असतानाच आता तपास यंत्रणांनी थेट अजून दोन पायलटला ताब्यात घेतले. ज्यामुळे जगात मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. यामुळे सर्वांचीच झोप उडाली. युएई पोलिसांनी फ्लायदुबई एअरलाईनमध्ये काम करणाखऱ्या मालदिवच्या 2 पायलट्सना ताब्यात घेतले. ही एक अत्यंत मोठी कारवाई म्हणावी लागेल.

फ्लायदुबईत मालदिवचे दोन पायलट नुकताच रूजू झाले होते. 3 ऑक्टोबर रोजीच यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतंय. मालदिवच्या दूतावासांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी दोन्ही पायलटला ताब्यात घेतल्यानंतर या कारवाईबद्दल त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. धक्कादायक माहिती म्हणजे मालदिवचे हे दोन्ही फ्लायदुबईत काम करणारे पायलट हम्मामीच्या संपर्कात होते. हम्मामी ज्या इमारतीमध्ये राहण्यास होता, त्याच इमारतीमध्ये हे दोघेही राहत.

या कटात या दोन पायलटची नक्की काय भूमिका होती, याचा तपास अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, खरोखरच यांचा काही सहभाग आहे का? याचा शोध हा घेतला जात आहे. मात्र, फ्लायदुबईतील घटनेने जगाला धक्का बसला. असे काही होऊ शकते, याचा कोणीही विचार करू शकत नाही. थोड्यात एक मोठी घटना होण्यापासून वाचले.

Follow Us
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?