Commonwealth Games 2022 :कॉमनवेल्थ गेम्सनंतर 2 पाकिस्तानी बॉक्सर गायब, फेडरेशन घेते आहे शोध, युरोपची नागरिकता मिळवण्यासाठी पळून गेल्याचा संशय

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 11, 2022 | 4:11 PM

बेपत्ता झालेल्या बॉक्सरची नावे सुलेमान बलोच आणि नजीरउल्ला अशी आहेत. जेव्हा सगळे प्लेअर्स हे बसमध्ये चढण्यासाठी जात होते, त्याचवेळी हे दोन्ही बॉक्सर गायब झाल्याची माहिती आहे. ही बस या प्लअर्सना घेऊन विमानतळावर येणार होती. तिथून विमानाने हे प्लेअर्स इस्लामाबादला परतणार होते.

Commonwealth Games 2022 :कॉमनवेल्थ गेम्सनंतर 2 पाकिस्तानी बॉक्सर गायब, फेडरेशन घेते आहे शोध, युरोपची नागरिकता मिळवण्यासाठी पळून गेल्याचा संशय
पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता
Image Credit source: social media

लंडन – कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games) सहभागी होण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानी खेळाडूंमधील दोन बॉक्सर (Two Pakistani boxers)बेपत्ता (disappeared )झाले आहेत. आता बॉक्सिंग फेडरेशन या दोघांचा शोध घेण्याच्या कामात व्यग्र आहे. आत्तापर्यंत या दोन्ही बॉक्सरचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नाही. या दोन्ही बॉक्सर्सना कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकही मेडल मिळालेले नाही. हे दोन्ही बॉक्सर्स कोत्यातरी युरोपीय देशात सुरक्षित भविष्यासाठी पळून गेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पाकिस्तानातील खेळाडू युरोप किंवा इतर देशांत गेल्यानंतर पळून गेल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असे अनेक प्लेअर्स बेपत्ता किंवा पळून गेल्याची माहिती आहे.

कोण होते हे दोन बॉक्सर?

‘द डेली पाकिस्तान’ने दिलेल्या वृत्तानुसार, बेपत्ता झालेल्या बॉक्सरची नावे सुलेमान बलोच आणि नजीरउल्ला अशी आहेत. जेव्हा सगळे प्लेअर्स हे बसमध्ये चढण्यासाठी जात होते, त्याचवेळी हे दोन्ही बॉक्सर गायब झाल्याची माहिती आहे. ही बस या प्लअर्सना घेऊन विमानतळावर येणार होती. तिथून विमानाने हे प्लेअर्स इस्लामाबादला परतणार होते. या दोघांचेही प्रवासाची कागदपत्रेही पाकिस्तानी अधिकाऱयांकडेच असताना या दोघांनी पळून जाण्याची हिंमत दाखवली आहे. घडलेल्या या प्रकाराबाबत इंग्लंड सरकारला माहिती देण्यात आली आहे. तूर्तास तरी याबाबत इंग्लंड सरकारकडून पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यात आलेला नाही. हे दोन्ही बॉक्सर बक्रिंगघममध्येच कुठेतरी लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

आता प्रकरण तपास अधिकाऱ्यांकडे

पाकिस्तान ऑलिंपिक असोसिएशनने हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले आहे. या प्रकरणात चौकशीसाठी चार सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या प्लेअर्सच्या सर्व प्रवासी कागदपत्रांची ही समिती चौकशी करणार आहे. इंग्लंडमध्ये या दोघांचे कुणी नातेवाईक वा मित्र आहेत का, याचाही शोध घेण्यात येतो आहे.

पाकिस्तानची बेइज्जती

पाकिस्तानातील एका अधिकाऱ्याने या प्रकरणात सांगितले की, या दोघा बॉक्सरच्या कृत्यामुळे पाकिस्तानची इभ्रत पणाला लागलेली आहे. इंग्लंड सरकारच्या मदतीने या दोघांचा लवकरात लवकर तपास लागावा, अशी सरकारची इच्छा आहे. या दोन्ही प्लेअर्सची कॉमनवेल्थमधील कामगिरी ही निराशाजनक राहिलेली आहे.

भारताने 10 वेळा केले पराभूत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना हा नेहमीच फार इर्षेने खेळला जातो. कॉमनवेल्थ गेम्स 2022  मध्येही जेव्हाही दोन्ही प्रतिस्पर्धी देशांचे प्लेअर्स कोणत्याही क्रीडा प्रकारात आमनेसामने आले तरी संपूर्म जगाचे लक्ष या मॅचकडे असे. बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटसह दहा क्रीडा प्रकारात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI