AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लागली वाट… अमेरिकेच्या लढाऊ विमानाने दिली जोरदार टक्कर, धक्कादायक व्हिडीओ, थेट..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. या व्हिडीओने एकच मोठी खळबळ उडालीये. जोरदर टक्कर अमेरिकेच्या लढाऊ विमानाने दिली आहे.

लागली वाट... अमेरिकेच्या लढाऊ विमानाने दिली जोरदार टक्कर, धक्कादायक व्हिडीओ, थेट..
US Air Force
| Updated on: May 18, 2026 | 7:37 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात अमेरिकेला मोठा धक्का बसला. इराणकडून अमेरिकेचे फायटर जेट उडवण्यात आलीत. यादरम्यानच आता अजून एक धक्कादायक घटना घडली. ज्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. अमेरिकेच्या आयडाहो राज्यात हवाई प्रदर्शनावेळी भीषण अपघात घडला. रविवारी दुपारी माउंटन होम एअर फोर्स बेसवर ‘गनफायटर स्काईज एअर शो’ दरम्यान थेट अमेरिकी नौदलाची दोन लढाऊ विमाने एकमेकांना आदळली. काही वेळ दोन्ही विमाने वेगळी करण्याचा प्रयत्न पायलटकडून करण्यात आला. मात्र, परिस्थिती अधिकच बिघडत गेली. विमानांमधून मोठी आग निघत होती. थेट हवेतून जमिनीवर ही दोन्ही विमाने कोसळली आणि मोठी आग पसरली. तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रचंड मोठी आग लागली. काही वेळातच या एअर शो बंद करण्यात आला. या दोन्ही विमानाची क्रू मेंबर सुरक्षित असल्याचीही माहिती मिळत आहे.

रिपोर्टनुसार, दोन्ही लढाऊ विमाने हवेत कसरत दाखवत होते. अचानक तोल गेल्याने एक विमान दुसऱ्या विमानाला जाऊन धडकले. आगीचा लोळ विमानातून निघत होता आणि दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. या घटनेचा एक संपूर्ण व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात सामील असलेली विमाने यूएस नेव्हीची EA18-G ग्रोव्हलर होती.

तात्काळ या अपघाताची चाैकशी समिती बसवण्यात आली. अपघात नक्की कोणत्या कारणाने झाला, याची सविस्तर चाैकशी होणार आहे. अमेरिकेच्या नौदलाने सांगितले की, रविवारी आयडाहोमधील माउंटन होम एअर फोर्स बेसजवळ एका हवाई प्रदर्शनादरम्यान दोन लष्करी विमानांची हवेत टक्कर झाली. या घटनेनंतर सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

अपघातानंतर विमानातून बाहेर पडण्यात त्यांना यश आले. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोणताही प्रेक्षक किंवा लष्करी कर्मचारी जखमी झाला नसल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, हा अपघात नक्की कसा झाला याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दोन्ही विमाने हवाई कसरत करत असताना अचानक एकमेकांना धडकल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...