रशिया-युक्रेन संघर्षातून तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारणही जाणून घ्या

Russia Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जगाला तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाटू लागला आहे. ब्रिटनने ही भीती बोलूनही दाखवली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे सर्व जगाचे लक्ष याकडे लागून आहे.

रशिया-युक्रेन संघर्षातून तिसऱ्या महायुद्धाचे ढग! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचं कारणही जाणून घ्या
दुसऱ्या महायुद्धाचा संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 11:16 AM

गेल्या काही दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये तणावपूर्ण (Russia-Ukraine Conflict) वातावरण निर्माण झाले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडीही तीव्र होत होत्या. अमेरिका, ब्रिटेन आदी देशांनी रशियाच्या हल्ल्याची शक्यताही वर्तवली होती. शेवटी ज्याची भीती होती ते रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशियाने याआधीच पूर्व युक्रेनमधील ‘डोनेस्तक’ आणि ‘लुहान्स्क’ येथे सैन्य पाठवले होते. यासोबतच रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या स्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या महायुद्धानंतर (Second World War) युरोपमधील सर्वात मोठ्या युद्धाची तयारी करत आहे.

रशिया आणि युक्रेनचे संबंध अधिकच ताणले जात आहेत. कारण युक्रेनच्या संरक्षणासाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनी नाटो देशांनीही आपले सैन्य पाठवले आहे. दुसरीकडे, रशिया युक्रेन सीमेवर शस्त्रास्त्रे आणि सैन्याची तैनाती सतत वाढत आहे. याआधी जगाला दोन महायुद्धांचा सामना करावा लागला आहे. दोन्ही महायुद्धात जगात कोट्यावधी मृत्यू तर झालेच पण उपासमार, महागाई अशी परिस्थिती निर्माण झाली. कसे घडले पहिले आणि दुसरे महायुद्ध जाणून घेऊ…

  • 1) पहिले महायुद्ध 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 पर्यंत चालले. या युद्धाची जबाबदारी कोणताही देश घेत नाही. पहिल्या महायुद्धाचे कारण ऑस्ट्रिया- हंगेरी साम्राज्याचे वारस व त्यांच्या पत्नीचा मृत्यू हे असल्याचे मानले जाते.
  • 2) जून 1914 मध्ये ऑस्ट्रिया-हंगेरी साम्राज्याचे वारस आर्कड्यूक फर्डिनांड आपल्या पत्नीसह बोस्नियाच्या सारेव्होला भेट देत होते. 28 जून 1914 रोजी त्यांची हत्या झाली. त्याच दिवशी त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवसही होता. या हत्येचा आरोप सर्बियावर होता.
  • 3) एका महिन्यानंतर ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. यानंतर हळूहळू बाकीचे देशही त्यात सामील झाले आणि दोन देशांच्या युद्धाचे रूपांतर महायुद्धात झाले. या युद्धात जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आदी देश सहभागी झाले होते.
  • 4) सुमारे 4 वर्षांच्या युद्धानंतर, 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीच्या शरणागतीने पहिले महायुद्ध संपले. 28 जून 1919 रोजी जर्मनीने व्हर्सायच्या तहावर स्वाक्षरी केली. या करारानुसार जर्मनीलाही आपल्या भूभागाचा मोठा भाग गमवावा लागला होता. जर्मनीवर अनेक निर्बंधही लादले गेले. ब्रिटीश सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या महायुद्धात ९४ लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

दुसरे महायुध्द

  • 1) पहिल्या महायुद्धाची जबाबदारी जर्मनीवर टाकण्यात आली आणि त्याला व्हर्सायच्या करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्यात आले. जर्मन नॅशनल सोशालिस्ट (नाझीझम) पक्षाचा नेता अॅडॉल्फ हिटलरने व्हर्सायचा तह रद्द करण्याचे आश्वासन दिले.
  • 2) फेब्रुवारी 1933 मध्ये हिटलर जर्मनीचा चांसलर बनला. त्यानंतर त्याने स्वतःला हुकूमशहा म्हणून घोषित केले. मार्च 1938 मध्ये जर्मनी आणि ऑस्ट्रिया एकत्र आले. मार्च 1939 मध्ये हिटलरच्या सैन्याने चेकोस्लोव्हाकियावर आक्रमण करून ते ताब्यात घेतले.
  • 3) चेकोस्लोव्हाकिया ताब्यात घेतल्यानंतर पोलंडची वेळ होती. 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मन सैन्य पोलंडमध्ये दाखल झाले आणि याबरोबरच दुसरे महायुद्ध सुरू झाले. यानंतर जग दोन भागात विभागले गेले. एक मित्र राष्ट्र होते ज्यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, सोव्हिएत युनियन असे देश होते आणि दुसरे होते जर्मनी, इटली आणि जपान हे राष्ट्र होते.
  • 4) हिटलरच्या सैन्याने नॉर्वे, डेन्मार्क, लक्झेंबर्ग, बेल्जियम, नेदरलँड आदी देश काबीज करायला सुरुवात केली. जर्मन सैन्याने सोव्हिएत युनियनविरुद्धही युद्ध पुकारले. जर्मन सैनिक सोव्हिएत सैन्यापुढे फार काळ टिकू शकले नाहीत. पुढे हिटलरने अमेरिकेविरुद्धही युद्ध सुरू केले.
  • 5) सोव्हिएत युनियनच्या पराभवानंतर जर्मन सैनिकांना युरोपीय देशांतूनही हाकलून लावले जाऊ लागले. अमेरिका, ब्रिटन आणि सोव्हिएत युनियनने मिळून जर्मन शहरांवर बॉम्बफेक सुरू केली.
  • 6) जर्मनीचा पराभव जवळजवळ निश्चित असताना, हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली. 8 मे 1945 रोजी जर्मनीने आत्मसमर्पण केले.
  • 7) जर्मनीच्या शरणागतीनंतरही जपान हार मानायला तयार नव्हता. यामुळे अमेरिकेने 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकीवर अणुबॉम्बने हल्ला केला. शेवटी जपाननेही शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध २ सप्टेंबर १९४५ रोजी संपले.
  • 8) दुसऱ्या महायुद्धात 78.5 कोटी लोक मारले गेले, ज्यामध्ये 55 कोटींहून अधिक सैनिक सहभागी होते. एवढेच नाही तर 30 लाखांहून अधिक लोक बेपत्ता झाले होते आणि अणुहल्ल्यामुळे आजही जपानमध्ये अनेक आजार आहेत.

संबंधित बातम्या :

Russia Ukraine Crisis: अमेरिकेने फक्त बोंबाबोब केली, पुतिन यांना रोखणं अशक्य, वाचा डिफेन्स एक्सपर्ट मारुफ रझा यांचं परखड विश्लेषण

Russia Ukraine Crisis: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, तिसऱ्या महायुद्धाची भीती आणखी वाढली!

Russia Ukraine Conflict: युक्रेनमध्ये कोणी नातेवाईक अडकला असल्यास करू नका काळजी, अश्या प्रकारे होईल भारतात त्यांची वापसी!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.