AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान पुन्हा हादरलं, बलुचिस्तानमधून मोठी बातमी

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंप आला आहे. भूकंपाच्या धक्क्यानं पाकिस्तान हादरलं आहे. बलुचिस्तानमध्ये अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

पाकिस्तान पुन्हा हादरलं, बलुचिस्तानमधून मोठी बातमी
| Updated on: Jun 14, 2025 | 8:53 PM
Share

पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंप आला आहे. भूकंपाच्या धक्क्यानं पाकिस्तान हादरलं आहे. बलुचिस्तानमध्ये अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळच्या वेळी सर्वजण आपल्या कामात गुंतलेले असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. पाकिस्तानातल्या पासनी शहरापासून 50 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.4.6 रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तीव्रता होती. य़ा भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र भूकंपाच्या पार्श्वभूमीवर येथील सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, येथील स्थानिक प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, भूकंपामुळे निर्माण झालेल्या संकट परिस्थितीमध्ये सरकारने जारी केलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन करा, असं आवाहनही तेथील सरकारकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. बलुचिस्तान हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे, त्यामुळे इथे अनेकदा असे भूकंपाचे धक्के जाणवतात अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

कराचीलाही भूकंपाचे धक्के

दुसरीकडे पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची देखील भूकंपाच्या धक्क्यानं हादरली आहे. आज सकाळच्या सुमारास कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. कराचीच्या पाच भागांमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोक घरातून बाहेर पडले. दरम्यान 15 दिवसांपूर्वी देखील कराचीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. आता पुन्हा एकदा कराचीमध्ये भूकंप झाला आहे. यामध्ये थोडीफार वित्ताहीनी वगळता कुठलीही जीवितहानी झाले नसल्याचं वृत्त आहे. 1 जून पासून ते आतापर्यंत कराचीला तब्बल 21 भूकंपाचे धक्के बसले आहेत.

दरम्यान दुसरीकडे पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप येऊ शकतो अशी शक्यता काही दिवसांपूर्वीच तेथील तज्ज्ञांनी वर्तवली होती. मात्र सध्या तरी पाकिस्तानला भूकंपाचे छोटे-छोटे हादरले बसत असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत कराचीमध्ये 21 भूकंपाचे धक्के बसले आहेत.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.