AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रिटीश मुलींना लैंगिक गुलाम बनवले, जेव्हा पाहीजे तेव्हा शोषण केले, 7 पाकिस्तानींना शिक्षा

जानेवारीमध्ये ब्रिटिश सरकारने ग्रूमिंग गँगच्या चौकशीसाठी £१० दशलक्ष वाटप केले. त्यानंतर स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर तपास सुरू करण्यात आला.परंतू हे पाऊल उशिरा उचलण्यात आले आहे अशी टीका होत आहे.

ब्रिटीश मुलींना लैंगिक गुलाम बनवले, जेव्हा पाहीजे तेव्हा शोषण केले, 7 पाकिस्तानींना शिक्षा
Updated on: Jun 14, 2025 | 8:13 PM
Share

ब्रिटनच्या मॅनचेस्टरमध्ये शुक्रवारी एका संवेदनशील आणि अनेक वर्षांपूर्वीच्या लैंगिक शोषण प्रकरणात सात पुरुषांना शुक्रवारी दोषी ठरवण्यात आले. मॅनचेस्टर मिनशुल स्ट्रीट क्राऊन कोर्टातील जूरींनी पाकिस्तानी मूळ असलेल्या या सात पुरुषांना दोन अल्पवयीन शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात दोषी ठरविले आहे. आता या आरोपींना मोठा तुरुंगवास होणार आहे. हे प्रकरण 2001 ते 2006 दरम्यान रोचडेलमध्ये झालेल्या लैंगिक शोषणाशी संबंधित हा निकाल आहे. ज्यात दोन अल्पवयीन मुलींना ‘सेक्स स्लेव्ह’ म्हणून वापरले गेले. या दोन्ही मुलींच्या कौटुंबिक पार्श्वभूमी अस्थिर होती. त्यांना ड्रग्ज, मद्य, सिगारेट्स आणि राहायला जागा आणि आधार देण्याच्या बदल्यात लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले. या मुलींना अनेक वर्षे अस्वच्छ फ्लॅट, बिछान्यात अनेक पुरुषांद्वारा वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडण्यात आले.

पीडित तरुणींची वेदनादायक कहाणी

सरकारी वकिलांनी सांगितले की दोन्ही मुलींचे वयाच्या १३ व्या वर्षापासून लैंगिक शोषण झाले होते. त्यांना घाणेरडे फ्लॅट्स, अस्वच्छ बिछाना, गाड्या, कार पार्कींगची जागा, गल्ल्या आणि निर्जन गोदामांमध्ये लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात होते. पीडित ‘गर्ल ए’ ने न्यायालयात सांगितले की तिचा फोन नंबर अनेक पुरुषांना शेअर केला गेला होता आणि कदाचित २०० हून अधिक पुरुषांनी तिच्या सोबत संबंध ठेवले होते. “इतके लोक होते की त्यांची मोजणी करणे कठीण होते,”असे तिने सांगितले.ती म्हणाली. ‘गर्ल ए’ ने २००४ मध्ये स्थानिक मुलांच्या एका गटाला सांगितले की ती “वृद्ध पुरुषांसोबत” वेळ घालवत होती, दारू पित होती आणि गांजा ओढत होती.

त्या स्वत:ला विकत होत्या ?

दूसरी एक पीडिता असलेल्या ‘गर्ल बी’ने सांगितले की ती स्थानिक मुलांच्या आश्रमात राहात होती. तेव्हा रोचडेलच्या इंडोर मार्केटमध्ये स्टॉल चालवणाऱ्या मोहम्मद जाहिद (64), मुश्ताक अहमद (67), आणि कासिर बशीर ( 50) यांनी तिचे लैंगिक शोषण केले. हे तिन्ही मुळेच पाकिस्तानी आहेत. ‘गर्ल बी’ ने कोर्टात सांगितले की पोलिस त्यांना नियमित पकडून न्यायचे, कारण सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना “वेश्या”असे ठरवले होते. त्यांनी रोचडेल सामाजिक सेवांच्या त्यांच्या फाईलमध्ये लिहीले होते की त्या 10 वर्षांच्या असल्यापासून त्या स्वत:ला विकत होत्या.

कोण आहेत हे सात दोषी ?

64 वर्षीय मोहम्मद जाहिद: याला ‘बॉस मॅन’ नावाने ओळखले जाते. त्याने स्वत:च्या लॉन्जरी स्टॉलमधून दोन्ही पीडितांना मोफत कपडे, पैसे, मद्य आणि जेवण दिले आणि त्या बदल्यात त्यांना त्यांच्या मित्रांशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. जाहिदला 2016 एका अन्य प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

67 वर्षीय मुश्ताक अहमद आणि 50 वर्षीय कासिर बशीर: दोघांना ‘गर्ल बी’च्या विरोधात बलात्कार आणि अश्लीलता प्रकरणात दोषी सिद्ध केले आहे. बशीर प्रकरणात सामील झाले नाही आणि फरार झाले. पोलीस त्यांना पकडण्यासाठी शोधत होते.

44 वर्षीय मोहम्मद शहजाद, 48 वर्षीय नाहीम अकरम, आणि 41 वर्षीय निसार हुसैन: हे तिन्ही रोचडेलमध्ये जन्मलेले टॅक्सी ड्रायव्हर आहेत. त्यांना ‘गर्ल ए’ विरोधात अनेक बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले गेले.या तिघांना जानेवारी महिन्यात जामीन रद्द झाल्यानंतर अटक करण्यात आली. ते देश सोडण्याचा प्रयत्नात असताना त्यांना अटक झाली.

39 वर्षीय रोहीज खान: याला 2013 एका अन्य रोचडेल लैंगिक शोषण प्रकरणात साडे सहा वर्षांची शिक्षा झाली. यास ‘गर्ल ए’विरोधात बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले गेले.

या प्रकरणात मोहम्मद जहीद, मुश्ताक अहमद, कासिर बशीर, आणि रोहेज खान पाकिस्तानात जन्मले होते. या शिवाय तीन अन्य दोषी – मोहम्मद शहजाद, नाहिम अकरम आणि निसार हुसैन हे देखील पाकिस्तानी मूळ असलेले आहे. परंतू त्यांचा जन्म रोचडेलमध्ये झाला होता. सुनावणी दरम्यान असे उघडकीस आले की हे सर्व पाकिस्तानात पळण्याच्या तयारीत होते. एक आठवा आरोपी अरफान खान (40), याला पुराव्या अभावी मुक्त केले आहे.

खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले ७३ तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले ७३ तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.