Geomagnetic storm: सावधान! पृथ्वीवर धडकणार भूचुंबकीय वादळ; मोबाईलचे सिग्नल गायब होणार, जगात ब्लॅकआऊट होण्याचाही धोका

हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे. सूर्याच्या वायुमंडळात एक छिद्र तयार झाल्यामुळे हे वादळ निर्माण झाले आहे. कॅनडा आणि अलास्कामध्ये मोठा किरणोत्सर्ग पहायला मिळणार आहे. या वादळामुळे मोबाईलचे गायब होण्याची शक्यता आहे. तसेच पावर ग्रीडवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे जगात ब्लॅकआऊट होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.

Geomagnetic storm: सावधान! पृथ्वीवर धडकणार भूचुंबकीय वादळ; मोबाईलचे सिग्नल गायब होणार, जगात ब्लॅकआऊट होण्याचाही धोका
वनिता कांबळे

|

Aug 03, 2022 | 5:32 PM

नवी दिल्ली : एक भूचुंबकीय वादळ(Geomagnetic storm ) वेगाने पृथ्वीवर धडकणार आहे. नॅशनल ओशिएन आणि अटमोसफेरीक अडमिनीस्ट्रेशन (National Ocean and Atmospheric Administration) कडून या वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे. सूर्याच्या वायुमंडळात एक छिद्र तयार झाल्यामुळे हे वादळ निर्माण झाले आहे. कॅनडा आणि अलास्कामध्ये मोठा किरणोत्सर्ग पहायला मिळणार आहे. या वादळामुळे मोबाईलचे गायब होण्याची शक्यता आहे. तसेच पावर ग्रीडवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे जगात ब्लॅकआऊट होण्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे.

भूचुंबकीय वादळ का येते

या भूचुंबकीय वादळांना सौर वादळ असेरही म्हणतात. हे वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारा एक प्रकारचा किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे उष्णता वाढते. ज्याला पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 15 ते 18 तास लागतात.

भूचुंबकीय वादळ म्हणजे नेमकं काय?

या भूचुंबकीय वादळांचा थेट सूर्यमालेशी आणि सूर्याशी संबंध आहे. या वादळामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. यातून मोछा किरणोत्सर्गार होतो. कित्येक वेळा सूर्यापासून निघालेले रेडिएशन बऱ्याच वेळा पृथ्वीपर्यंत पोहोचते. मात्र, पृथ्वीच्या गाभ्यातून निघणाऱ्या चुंबकीय तरंगांमुळे पृथ्वीच्या भोवती एक प्रकारचं सुरक्षा कवच तयार झालेलं असतं; जे आपल्याला या रेडिएशनपासून वाचवतं. सौरवादळाच्या वेळी मात्र रेडिएशन अगदीच जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे हे कवच भेदले जाते.

भूचुंबकीय वादळाचे परिणाम

हे भूचुंबकीय वादळ रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय आणू शकतात. यामुळे जीपीएस, तसेच मोबईल नेटवर्कवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ब्लॅकआउट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वादळाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

यापूर्वीही आले होते अशा प्रकारचे वादळ

यापूर्वी 1989 साली अशा प्रकारचे भूचुंबकीय वादळ आले होते. या वादळाचा परिणाम कॅनडा देशातील क्युबेक शहरावर दिसून आला होता. या वादळामुळे अमेरिका आणि युरोपातील टेलिग्राफ नेटवर्क बंद पडलं होतं.

पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड वाढला! Google, Amazon, Meta सारख्या बड्या कंपन्या टेंन्शनमध्ये

पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाच स्वतःभोवतीही फिरत असते. त्यामुळेच पृथ्वी जी बाजू सूर्याच्या दिशेला असते तिकडे दिवस असतो आणि विरुद्ध बाजूला रात्र असते. पृथ्वीचा दिवस-रात्रीचा हा एक दिवस सामान्यपणे 24 तासांचा असतो. मात्र, पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड वाढला आहे. सामान्य गतीने फिरणारी पृथ्वी आता स्वतःभोवती अधिक वेगाने फिरू लागल्याची माहिती समोर आली आहे. पृथ्वीच्या या वाढत्या वेगाने IT सेक्टरची चिंता वाढवली आहे. पृथ्वीच्या गती भोवती मॅच होण्यासाठी लीप सेकंड(earth leap second) केल्यास कॉम्प्युटर आणि मोबाईल सारखे गॅजेट क्रॅश होऊ शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें