Operation Sindoor : रौफ ढगात, खौफ संपला, भारताच्या आणखी एका शत्रूला घुसून मारलं
Operation Sindoor : भारताचा आणखी एक मोठा शत्रू पाकिस्तानाला मारला गेल्याची बातमी आहे. रौफ अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु आहे. अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्लची हत्या याच रौफ अजहरने केली होती. डॅनियल पर्ल यांच्या मृत्यूचा बदला सुद्धा भारताने घेतला आहे.

भारताचा आणखी एक मोठा शत्रू पाकिस्तानाला मारला गेल्याची बातमी आहे. रौफ अजहरचा मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु आहे. रौफ अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरचा भाऊ आहे. काल बहावलपूरमध्ये भारतीय सैन्याने एअरस्ट्राइक केला. त्यात जैशच मुख्यालय उडवलं. मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. मी सुद्धा मेलो असतो तर बरं झालं असतं असं मसूद अजहरने म्हटलं होतं. दहशतवादाविरुद्ध भारतीय सैन्य आर-पारच्या मूडमध्ये आहे, असं दिसतय. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, हे भारत सरकारने स्पष्ट केलय. रौफ अजहरचा हा IC-814 कंदहार हायजॅकचा मास्टरमाइंड होता. 1999 साली इंडियन एअर लाइन्सच्या या विमानाच अपहरण करण्यात आलं होतं. या विमानातील प्रवाशांच्या मोबदल्यात मसूद अजहरला भारत सरकारला जिवंत सोडावं लागलं होतं. पुढे जाऊन त्याने 2001 साली भारतीय संसदेवर हल्ला केला. त्यानंतर 2019 साली पुलवामा घडवून आणलं, ज्यात आपले 40 जवान शहीद झाले होते.
रौफ अजहरला पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा आश्रय होता. सतत भारताविरोधात त्याची विषारी वक्तव्य सुरु होती. पण भारतीय सैन्याने त्याचा खेळ संपवल्याची माहिती आहे. यावर लवकरच आणखी अपडेट येऊ शकते. कुठे त्याचा खात्मा झाला आहे.
‘मी मेलो असतं तर बर झालं असतं’
अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्लची हत्या याच रौफ अजहरने केली होती. डॅनियल पर्ल यांच्या मृत्यूचा बदला सुद्धा भारताने घेतला आहे. मसूद अजहरने म्हटलं होतं, मी मेलो असतं तर बर झालं असतं. त्याची सुद्धा इच्छा भारतीय सैन्य लवकरच पूर्ण करेल यात कुठलीही शंका नाही. कारण भारत सरकारने ज्या पद्धतीने कारवाईच्या मूडमध्ये आहे, त्यावरुन पाकिस्तानात भारतविरोधी कारवाई करणारा एकही दहशतवादी टिकणार नाह हेच दिसतय.
चीनने मार्ग अडवलेला
रौफ अजहर दीर्घकाळापासून जैश-ए-मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता होता. मसूद अजहरचा तो छोटा भाऊ होता. रौफ अजहरला पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा ISI कडून संरक्षण मिळालेलं. रावळपिंडीसह पाकिस्तानात तो खुलेआम फिरत होता. अमेरिकेने 2010 साली त्याच्यावर प्रतिबंध लावले होते. भारताने अनेकदा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न केला. पण चीनने वीटो अधिकार वापरुन त्यात खोडा घातला.
