Afghanistan: 100 हून अधिक अफगाण सैन्य अधिकारी बेपत्ता! तालिबानने ठार केल्याचा संशय

मानवाधिकार संस्थेने फक्त गझनी, हेलमंड, कंदाहार आणि कुंदुझ या चार प्रांतातून 100 हून अधिक हत्यांची खात्रीदायक माहिती गोळा केली आहे. त्यामुळे, संपूर्ण अफगाणिस्तानात, आणखी बरेच अफगाण पोलीस अधिकारी बेपत्ता किंवा मरण पावले असण्याची शक्यता आहे.

Afghanistan: 100 हून अधिक अफगाण सैन्य अधिकारी बेपत्ता! तालिबानने ठार केल्याचा संशय
Afghanistan File photo
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 10:09 PM

काबुलः अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा दहशतवाद दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रहिवाशांच्या हत्येच्या अनेक घटनांनंतर, आता अफगाणिस्तानातील पोलिस अधिकारी अक्षरशः गायब झालेय आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. ह्युमन राइट्स वॉच (HRW) ने अफगाण नॅशनल सिक्युरिटी फोर्सेस (ANSF) च्या लष्करी कर्मचारी, पोलीस आणि गुप्तचर सेवा सदस्यांच्या 47 माजी सदस्यांची हत्या किंवा बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. या अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर दरम्यान तालिबानी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले किंवा त्यांना अटक केली गेली होती. या बेपत्ता पोलिस अधिकाऱ्यांनी तालिबानपुढे आत्मसमर्पण केले का तालिबानने त्यांना अटक केली याबाबत कोणतीही माहिती प्राप्त नाहीये.

चार प्रांतातून 100 हून अधिक पोलीस आधिकाऱ्यांचा हत्या

मानवाधिकार संस्थेने फक्त गझनी, हेलमंड, कंदाहार आणि कुंदुझ या चार प्रांतातून 100 हून अधिक हत्यांची खात्रीदायक माहिती गोळा केली आहे. त्यामुळे, संपूर्ण अफगाणिस्तानात, आणखी बरेच अफगाण सैन्य अधिकारी बेपत्ता किंवा मरण पावले असण्याची शक्यता आहे. “तालिबानच्या नेतृत्वाने अफगाण सुरक्षा दलाच्या सदस्यांना माफी देण्याचे आश्वासन देऊनही, स्थानिक कमांडरना सरसकटपणे फाशी देणं किंवा पोलीस आधिकाऱ्यांना गायब करणं थांबलेलं नाही. पुढील हत्ये टाळण्यासाठी, या हत्यांसाठी जबाबदार धरून कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याचा भार आता तालिबानच्या नेत्रुत्वावर असणार आहे,” असं ह्युमन राइट्स वॉचच्या आशिया संचालक, पॅट्रिशिया गॉसमन म्हणाले.

सुरक्षिततेची हमी देणारे पत्र

ह्युमन राइट्स वॉचने चार प्रांतांमध्ये 40 लोकांची वैयक्तिक मुलाखत घेतली आणि इतर 27 जणांची दूरध्वनीद्वारे मुलाखत घेतली. यामध्ये साक्षीदार, पीडितांचे नातेवाईक आणि मित्र, माजी सरकारी अधिकारी, पत्रकार, आरोग्यसेवा कर्मचारी आणि तालिबान सदस्य यांचा समावेश होता.

तालिबान नेतृत्वाने आत्मसमर्पण करणाऱ्या सुरक्षा दलाच्या सदस्यांना स्वतःची नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर त्यांना त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणारे पत्र दिले जाईल, असे ह्युमन राइट्स वॉचने म्हटले. पण, तालिबानच्या सैन्याने या स्क्रीनिंगचा उपयोग लोकांना नोंदणी केल्यानंतर काही दिवसांतच ताब्यात घेण्यासाठी, फाशी देण्यासाठी किंवा जबरदस्तीने गायब करण्यासाठी केला गेला होता.

इतर बातम्या

Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा नवे दर

सोन्याचे दागिने विकणे ज्वेलर्सना पडणार भारी, मोदी सरकारचा कायदा देशातील 256 शहरांत लागू

महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘मविम’चा दुबईतील कंपन्यासोबत करार

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.