सोन्याचे दागिने विकणे ज्वेलर्सना पडणार भारी, मोदी सरकारचा कायदा देशातील 256 शहरांत लागू

विशेष म्हणजे वाढत्या कॅरेटमुळे सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि किमतीत तफावत आहे. म्हणजेच जेवढे जास्त कॅरेटचे सोने तेवढे ते अधिक महाग होणार आहे. सोने खरेदी करताना ग्राहक त्याच्या गुणवत्तेकडे नक्कीच लक्ष देतात. केंद्रीय ग्राहक आणि अन्न व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हाही ग्राहक सोने खरेदीसाठी जातात तेव्हा हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करतात.

सोन्याचे दागिने विकणे ज्वेलर्सना पडणार भारी, मोदी सरकारचा कायदा देशातील 256 शहरांत लागू
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली : देशातील 256 शहरांमध्ये हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकण्यावर आता कारवाई सुरू झालीय. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ने हॉलमार्क नसलेल्या सोन्याचे दागिने बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू केलीय. देशात सोन्याच्या दागिन्यांवर नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू करण्यात आलाय.

तर व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे अधिकारी देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची विक्री करताना आढळलेल्या कोणत्याही व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करणार आहेत. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने यंदा 16 जूनपासून या 256 शहरांमध्ये हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करणे बंधनकारक केले होते. यासोबतच ज्वेलर्सना 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत जुन्या दागिन्यांचा साठ्याला हॉलमार्क करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेय. आता हा वाढीव कालावधी संपलाय.

ज्वेलर्सला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो

22 कॅरेट सोने असल्याचे भासवून 18 कॅरेट सोने विकल्यास ज्वेलर्सला दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. ग्राहकांची होणारी फसवणूक पाहता केंद्र सरकारने गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नवे कायदे आणलेत. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींसाठी हॉलमार्क प्रणालीही देशात लागू करण्यात आलीय. नवीन ग्राहक कायदा लागू झाल्यानंतर आता हॉलमार्किंगचे नियम पाळणे अधिक कडक होणार आहे.

हॉलमार्क पाहूनच आता सोने खरेदी करा

विशेष म्हणजे वाढत्या कॅरेटमुळे सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि किमतीत तफावत आहे. म्हणजेच जेवढे जास्त कॅरेटचे सोने तेवढे ते अधिक महाग होणार आहे. सोने खरेदी करताना ग्राहक त्याच्या गुणवत्तेकडे नक्कीच लक्ष देतात. केंद्रीय ग्राहक आणि अन्न व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हाही ग्राहक सोने खरेदीसाठी जातात तेव्हा हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करतात. हॉलमार्क ही एक प्रकारची सरकारी हमी आहे आणि ती देशातील एकमेव एजन्सी म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे ठरवली जाते. हॉलमार्क पाहून खरेदी करण्याचा फायदा असा आहे की, नजीकच्या भविष्यात जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला कमी किंमत मिळणार नाही, परंतु तुम्हाला सोन्याची खरी किंमत मिळेल.

दागिन्यांच्या जुन्या साठ्याची सबब पुढे चालणार नाही

या संदर्भात एक अधिसूचना केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 जानेवारी 2020 ला जारी केली होती. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी ज्वेलर्सना एक वर्षाची मुदत दिली होती. नंतर हा कालावधी आणखी वाढवण्यात आला. ज्वेलर्सना वर्षभरात त्यांचा जुना साठा साफ करण्यासाठी मुदत वाढवण्यात आली होती.

सोन्याच्या किमतीच्या पाचपट दंड

ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार आता ज्वेलर्सना एक लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. यासोबतच सोन्याच्या किमतीच्या पाचपट दंड म्हणून भरण्याची तरतूदही करण्यात आली. सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास कोणत्याही हॉलमार्किंग केंद्रात जाऊन ते तपासता येईल. देशभरात सुमारे 900 हॉलमार्किंग केंद्रे आहेत. तुम्ही त्यांची यादी bis.org.in वर पाहू शकता. नवीन नियमांनुसार आता सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे. त्यासाठी ज्वेलर्सना परवाना घ्यावा लागतो. केंद्र सरकारने 14 कॅरेट, 16 कॅरेट, 18 कॅरेट, 20 कॅरेट आणि 22 कॅरेट दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य केलेय.

संबंधित बातम्या

Gold Price Today : सोने स्वस्त, चांदीचे भावही घसरले, पटापट तपासा नवे दर

WhatsApp वरून तुमचे डीमॅट खाते उघडा आणि IPO साठी करा अर्ज, पण कसा?

Published On - 9:36 pm, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI