AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Iran : तीन व्यापारी जहाजांवर हल्ला, अमेरिकेकडून एकाचवेळी इराणमधील 80 ठिकाणांवर बॉम्बफेक करुन उत्तर

US-Iran : काल स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. अमेरिकेने यासाठी इराणला जबाबदार ठरवलं. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने एकाचवेळी इराणमधील 80 ठिकाणांवर बॉम्बफेक केली. त्याशिवाय तेलाच्या बाबतीत अमेरिकेने इराणला अजून एक झटका दिला.

US-Iran : तीन व्यापारी जहाजांवर हल्ला, अमेरिकेकडून एकाचवेळी इराणमधील 80 ठिकाणांवर बॉम्बफेक करुन उत्तर
US Jets
| Updated on: Jul 08, 2026 | 8:49 AM
Share

काही दिवसांच्या शांततेनंतर अमेरिका आणि इराणमधली परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये इराणकडून तीन व्यापारी जहाजांवर हल्ला करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्याने एकाचवेळी इराणच्या 80 पेक्षा जास्त सैन्य तळांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापार सुरक्षा आणि इराणची सैन्य क्षमता कमकुवत करण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचं अमेरिकी सेंट्रल कमांडने दावा केला आहे. या ताज्या हल्ल्यानंतर इराणने सुद्धा पलटवार करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात इराणची एअर डिफेन्स सिस्टिम, कमांड अँड कंट्रोल सेंटर, किनारपट्टी रडार स्टेशन, अँटी-शिप मिसाइल लॉन्चर, ड्रोन लॉन्च साइट आणि इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आयआरजीसीच्या 60 पेक्षा जास्त स्पीड बोट्सना लक्ष्य करण्यात आलं.

त्याशिवाय बंदर अब्बास, केश्म द्वीप आणि सीरिकच्या आसपासच्या सैन्य ठिकाणांवर सुद्धा हवाई हल्ले करण्यात आले. बंदर अब्बासमध्ये शहीद हक्कानी पोर्टवर सुद्धा हल्ला करण्यात आला. इराणकडून हॉर्मुज स्ट्रेटमधून जाणाऱ्या मार्शल आयलँडच्या एम/टी अल रेकय्यात, सौदी अरबच्या एम/टी वेदयान आणि लायबेरियाच्या एम/टी सायप्रस प्रॉस्पेरिटीवर हल्ला करण्यात आला. अमेरिकेने या हल्ल्यासाठी थेट इराणला जबाबदार ठरवत हे युद्धविरामाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.

हल्लाच नाही अमेरिकेने इराणला अजून एक झटका दिला

या हल्ल्यामध्ये एका टँकरला आग लागली. अन्य दोन जहाजांचं सुद्धा नुकसान झालं. जिवीतहानी झाली नाही. ब्रिटनच्या समुद्र सुरक्षा एजन्सीनुसार हे सर्व हल्ले ओमान आणि संयुक्त अरब अमीरातच्या किनारपट्टीजवळ झाले. तिथे इराणी सरकारी मीडियाने बंदर अब्बास, केश्म आणि सीरिकमध्ये जोरदार स्फोट झाल्याची पृष्टी केली आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काजेम गरीबाबादी यांनी अमेरिकेच्या कारवाईला अंतरिम कराराचं उल्लंघन ठरवून कठोर निषेध केला. आता या कारवाईचे जे परिणाम होतील, त्याची सर्व जबाबदारी अमेरिकेची असेल असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. तणाव वाढल्यानंतर अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेली परवानगी सुद्धा रद्द केली आहे. अमेरिकेनुसार व्यापारी जहाजांवर हल्ला हे युद्धविरामाचं उल्लंघन आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु