AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार

Israel : मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धात काल सीजफायरची घोषणा झाली. पण हा सीजफायर किती दिवस चालेल या बद्दल शंकाच आहे. पाकिस्तान कशी मध्यस्थी करतो हे सुद्धा जग पाहतय. पाकिस्तानने एक गोष्ट म्हटली त्यानंतर पुढच्या दहा मिनिटात इस्रायलने अक्षरश: कहर केला.

Israel : पाकिस्तानने असं म्हणण्याची खोटी, पुढच्या 10 मिनिटात इस्रायलचा अक्षरश: कहर, 100 मिसाइल्स मारले, शेकडो ठार
Attack on lebanon
| Updated on: Apr 09, 2026 | 10:00 AM
Share

मध्य पूर्वेत मागच्या 35 पेक्षा जास्त दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धात अखेर काल सीजफायरची घोषणा झाली. पण सीजफायर दीर्घकाळ टिकेल का? या बद्दल शंका आहे. कारण इस्रायलकडून शेजारच्या लेबनॉनवर भयंकर हल्ले सुरु आहेत. इस्रायलने इराण-अमेरिका सीजफायरचं समर्थन केलं आहे. पण दुसऱ्याबाजूला लेबनॉनवर इस्रायली हल्ले सुरुच आहेत. त्यामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलं आहे. हे सीजफायर फक्त इराण बरोबर झालेलं आहे. लेबनॉनशी त्याचा काही संबंध नाही असा इस्रायलचा दावा आहे. लेबनॉनची सीमा इस्रायलला लागून आहे. तिथून अनेकदा इस्रायली नागरिकांवर रॉकेट हल्ला होतो. इस्रायलला हा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. यासाठी इस्रायल बफर झोन तयार करत आहे. लेबनॉनमधून हिज्बुल्लाहचा पूर्णपणे नायनाट हाच इस्रायलचं उद्देश आहे. त्यासाठी लेबनॉन सीजफायरचा भाग नाही असं इस्रायलचं म्हणणं आहे.

अमेरिकेने सुद्धा हे स्पष्ट केलय की, अमेरिका-इराण युद्धविरामाचा लेबनॉनशी काहीही संबंध नाही. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी सीजफायरमध्ये लेबनॉनच्या समावेशाला सहमती दिलेली नाही. लेबनॉन या सीजफायरचा भाग आहे असं पाकिस्तानने म्हटल्यानंतर इस्रायलने अवघ्या 10 मिनिटात लेबनॉनवर 100 मिसाइल्स डागले. यात शेकडो लोक ठार झाले. लेबनॉन मिडिल ईस्टमधील एक छोटासा देश आहे. लेबनॉनमध्ये इराणने पोससेली हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना सक्रीय आहे. त्यांच्याकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरु असतात.

इस्रायलने काय म्हटलय?

लेबनॉनला सीजफायरच्या बाहेर का ठेवण्यात आलय? यावर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिज्बुल्लामुळे असं उत्तर दिलं. इराण विरुद्ध सैन्य कारवाई दोन आठवड्यांसाठी थांबवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाचं आम्ही समर्थन करतो असं इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. 28 फेब्रुवारीला अमेरिका-इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं. दिवसेंदिवस हे युद्ध ऊर्जा युद्धामध्ये बदलू लागलं होतं. ज्याची किंमत सगळ्या जगाला चुकवावी लागत होती. त्यामुळे दोन आठवड्यांच्या सीजफायरच्या घोषणेमुळे सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडलाय. पाकिस्तानात उद्यापासून सीजफायर दीर्घकाळ रहावं यासाठी चर्चा सुरु होणार आहेत.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?