AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण पाठोपाठ पाकिस्तानमुळे अमेरिकेसमोर नवीन संकट, भारताचही वाढलं टेन्शन

इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नसताना पाकिस्तानमुळे अमेरिकेसमोर एक नवीन आव्हान निर्माण झालं आहे. भारतासाठी सुद्धा ही चिंता वाढवणारी बाब आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानने भारताकडून भरपूर मार खाल्ला. पण अजून ते सुधरलेले नाहीत.

इराण पाठोपाठ पाकिस्तानमुळे अमेरिकेसमोर नवीन संकट, भारताचही वाढलं टेन्शन
us-pakistan
| Updated on: Jun 26, 2025 | 11:43 AM
Share

इराणच्या अणवस्त्र कार्यक्रमाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नसताना अमेरिकेसमोर एक नवीन संकट निर्माण झालं आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एक बॅलेस्टिक मिसाइल विकसित करत आहे. हे मिसाइल अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. पाकिस्तानने असं हत्यार बनवलं, तर अमेरिकेसह भारताची सुद्धा चिंता वाढेल. कारण या मिसाइलद्वारे पाकिस्तान भारताच्या कुठल्याही कोपऱ्यापर्यंत हल्ला करण्यास सक्षम होईल. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान चीनच्या मदतीने आपला अणवस्त्र कार्यक्रम अधिक अत्याधुनिक करत असल्याच वृत्त आहे. एका रिपोर्टनुसार अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की, पाकिस्तानने अशी मिसाइल बनवली, तर अमेरिका त्यांना अणवस्त्र विरोधी जाहीर करेल.

ICBM एक लांब पल्ल्याच मिसाइल आहे. त्याची रेंज 5,500 किलोमीटर (3,400 मैल) पेक्षा जास्त आहे. एक किंवा त्यापेक्षा अधिक अणवस्त्र वाहून नेण्यासाठी असं मिसाइल बनवण्यात येतं. ICBM सैद्धांतिक दृष्टीने पारंपरिक, रासायनिक आणि जैविक शस्त्र वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. आधुनिक ICBM मध्ये ऑटो चारगेट MIRV असतं. त्यामुळे एकच मिसाइल एकाचवेळी अनेक वॉरहेड वेगवेगळ्या लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम असतं. असं मिसाइल अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, यूनायटेड किंगडम, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरियाजवळ आहे. पाकिस्तान एक अणवस्त्र संपन्न देश आहे. मात्र, त्यांच्याकडे ICBM क्षमता नाहीय. आता त्यांनी सुद्धा या शर्यतीत उडी घेतली आहे. ICBM म्हणजे आंतरखंडीय क्षेपणास्त्र.

शाहीन-3 ची रेंज काय?

आमचा अणवस्त्र कार्यक्रम भारताला रोखण्यासाठी आहे पाकिस्तानने आतापर्यंत अनेकदा असा दावा केला आहे. छोटी आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र विकसित करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. 2022 साली पाकिस्तानने जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी मीडियम रेंज बॅलेस्टिक मिसाइल शाहीन-3 ची चाचणी केली होती. 2,700 किलोमीटरपेक्षा जास्त लांबच्या लक्ष्यभेद करण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. अनेक भारतीय शहरं या मिसाइलच्या रेंजमध्ये येतात.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.