AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel Air Strike : इराण,सीरियानंतर इस्रायलचा आणखी एका देशाच्या महत्त्वाच्या बंदरावर एअरस्ट्राइक

Israel Air Strike : मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल वेगवेगळ्या युद्धांमध्ये व्यस्त आहे. हमास, हिज्बुल्लाह, इराण, सीरिया त्यानंतर आता आणखी एका देशाच्या महत्त्वाच्या बंदरावर इस्रायलने एअरस्ट्राइक केला आहे. मध्य पूर्वेमध्ये मागच्या दोन वर्षांपासून संघर्ष वाढले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी सुरु आहे.

Israel Air Strike : इराण,सीरियानंतर इस्रायलचा आणखी एका देशाच्या महत्त्वाच्या बंदरावर एअरस्ट्राइक
Israel Air Strike
| Updated on: Jul 22, 2025 | 9:00 AM
Share

युद्धखोरीमुळे अमेरिकेसह संपूर्ण जग इस्रायलची निंदा करतय. मात्र, इस्रायल या सगळ्या टीकेकडे दुर्लक्ष करुन आपल्या भूमिकेवर ठाम आहे. इस्रायलने एकाचवेळी अनेक आघाड्या उघडल्या आहेत. मागच्याच महिन्यात इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. हे युद्ध संपल्यानंतर इस्रायलकडून गाजा,लेबनान आणि सारियावर हल्ले करण्यात आले. मागच्या दोन वर्षांपासून इस्रायल वेगवेगळ्या शत्रुंविरुद्ध युद्धच लढत आहे. इस्रायलने आता आणखी एका देशावर हल्ला केला आहे. इस्रायलला इराणनंतर दुसरा धोका हूतींकडून आहे. रेड सी मध्ये हुतींमुळे इस्रायलच एलिट पोर्ट जवळ-जवळ ठप्प झालं आहे. आता इस्रायल अमेरिकेच्या मदतीशिवाय हुतींवर हल्ले करत आहे.

इस्रायली एअर फोर्सने येमेनमध्ये हवाई हल्ल्यांची मालिका सुरु केली आहे, इस्रायली मीडियाने सोमवारी ही माहिती दिली. इस्रायलने येमेनमधील होदेइदाह क्षेत्रासह पश्चिम किनाऱ्याला टार्गेट केलं. यावेळच्या हल्ल्याची नवीन गोष्ट म्हणजे इस्रायलने कुठल्याही इशाऱ्याशिवाय हे हल्ले केले. इस्रायलचा येमेनवरील हा 12 वा हल्ला आहे. हुती बंडखोरांनी गाजामध्ये हमासच समर्थन केलय. त्यावरुन या सगळ्या वादाला सुरुवात झाली. हमासच्या समर्थनार्थ हुती बंडखोरांनी रेड सी मध्ये इस्रायल-अमेरिकेशी संबंधित जहाजांवर हल्ले केले. इस्रायलला हिजबुल्लाह प्रमाणे हुती बंडखोरांपासून असणारा धोका मूळापासून संपवायचा आहे.

इस्रायली फायटर जेट्सनी घ्यावी लागली माघार

येमेनच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इस्रायली हल्ले रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना कितपत यश मिळालं, त्या बद्दल ठोस माहिती नाहीय. 7 जुलैला इस्रायली एअर फोर्सने येमेनच्या होदेइदाह, सालिफ आणि रास ईसा येथे प्रमुख बंदरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. इस्रायलचा मोठ्या हल्ल्याचा प्रयत्न हुती बंडखोरांनी उधळून लावला होता.

लेबनानी न्यूज अल मायादीनशी बोलणाऱ्या सैन्य सूत्राने सांगितलं की, येमेनी सैन्याने जमिनीवरुन हवेत मारा करणारी मिसाइल्स डागली. त्यामुळे इस्रायली फायटर जेट्सच्या पहिल्या ताफ्याच्या मार्गात अडथळे आले. परिणामी इस्रायलच्या 10 फायटर जेट्सना मिशन पूर्ण करण्याआधीच येमेनच्या हवाई क्षेत्रातून माघार घ्यावी लागली होती.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...