पुन्हा गोव्याच्या विमानात बाँबची धमकी, आवड्याभरात दुसरा प्रकार

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकीची घटना ताजी असताना पुन्हा नवीन धमकी मिळाली आहे. मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले

पुन्हा गोव्याच्या विमानात बाँबची धमकी, आवड्याभरात दुसरा प्रकार
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 2:46 PM

मॉस्को : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकीची घटना ताजी असताना पुन्हा नवीन धमकी मिळाली आहे. मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले. या विमानात २४० प्रवासी होते. हे विमान पहाटे ४.१५ वाजता दक्षिण गोव्यातील दाबोलीम विमानतळावर उतरणार होते. विमानात प्रवाशांशिवाय सात क्रू मेंबर्स असल्याचे सांगण्यात आले आहे.

चार दिवसांपुर्वी मास्कोहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचे गुजरातच्या जामनगर विमानतळावर आपात्कालनी लँडिंग करण्यात आलं. या विमानातही बाँब असल्याची धमकी मिळाली होती. मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या AZV2463 या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमान भारतीय हवाई हद्दीत पोहोचण्यापूर्वी वळवण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाबोलिम विमानतळावर रात्री १२.३० वाजता ईमेलद्वारे या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच विमान वळवण्यात आले.

वास्कोचे उपपोलिस अधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांसह बॉम्ब आणि श्वान पथक, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि दहशतवादविरोधी पथक (एटीएस) विमानतळावर तैनात करण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

१७ जानेवारीला मिळाली धमकी

रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी यापुर्वी १७ जानेवारीला मिळाली होती. दूतावासाने ही माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. त्यानंतर रात्री ९.३० च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर आपात्कालीन लँडिंग केले गेले होते. जामनगर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा, बाँबशोधक पथक तैनात होते. सर्वात प्रथम विमानातील सर्व २३६ प्रवाशी व क्रू मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्रवाशी पॅनिक होऊ नये म्हणून त्यांना विमानतळावरील लॉन्जमध्ये नेण्यात आले. हे विमान अजूर एयरचे होते. त्यांना धमकी मिळाल्यानंतर कंपनीने रशियान दूतावासाल कळवले. रशियन दूतावासाने ही माहिती भारतीय यंत्रणांना दिली होती. त्या विमानाला धमकी देणाऱ्याचा शोध अजून लागलेला नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.