मॉस्को-गोवा विमानात बॉम्बची धमकी; विमानचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवाशी…

रशियन दूतावासाने ही माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. रात्री ९.३० च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर आपात्कालीन लँडिंग केले गेले. जामनगर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा, बाँबशोधक पथक तैनात होते.

मॉस्को-गोवा विमानात बॉम्बची धमकी; विमानचे इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवाशी...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 5:03 PM

नवी दिल्ली : Moscow-Goa Flight Bomb Threat : मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यानंतर मानाचे गुजरातच्या जामनगर विमानतळावर आपात्कालनी लँडिंग करण्यात आलं. या विमानातील २३६ प्रवासी आणि आठ क्रू मेंबर्सला सुरक्षित उतरवण्यात आले. आता मागील दहा तासांपासून बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची तपासणी सुरु आहे. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा इतर ऐवज सापडला नाही. आता सुरक्षा यंत्रणेने हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विमान गोव्याकडे रवाना होणार आहे.

रशियाच्या दूतावासाला मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. दूतावासाने ही माहिती गोवा एअर ट्राफीक कंट्रोलला दिली. रात्री ९.३० च्या सुमारास या विमानाचे जामनगरमधील इंडियन एअर फोर्स बेसवर आपात्कालीन लँडिंग केले गेले. जामनगर विमानतळावर सुरक्षा यंत्रणा, बाँबशोधक पथक तैनात होते. सर्वात प्रथम विमानातील सर्व २३६ प्रवाशी व क्रू मेंबर्सला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

हे सुद्धा वाचा

कोणाला मिळाली धमकी : विमानात बाँब असल्याच्या धमकीनंतर खळबळ उडाली होती. प्रवाशी पॅनिक होऊ नये म्हणून त्यांना विमानतळावरील लॉन्जमध्ये नेण्यात आले. हे विमान अजूर एयरचे होते. त्यांना धमकी मिळाल्यानंतर कंपनीने रशियान दूतावासाल कळवले. रशियन दूतावासाने ही माहिती भारतीय यंत्रणांना दिली. आता सुरक्षा यंत्रणा धमकी कुठून मिळाली आणि कोणी दिली त्याचा शोध घेणार आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.