Air India Dreamliner : हवेत असतानाच आणखी एका एअर इंडियाच्या विमानात बिघाड, वैमानिकाने उचललं महत्त्वाच पाऊल
Air India Dreamliner : अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका एअर इंडियाच्या विमानात बिघाड झालाय. विमान हवेत असताना हा बिघाड झाला.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाल्याची घटना ताजी आहे. या परिस्थितीत आता एअर इंडियाच्या आणखी एका विमानाच हाँगकाँग एअरपोर्टवर तातडीने लँडिंग करण्यात आलं. AI 315 या एअर इंडियाच्या विमानाने हाँगकाँगवरुन दिल्लीला येण्यासाठी उड्डाण केलं होतं. पण हवेत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याच वैमानिकाच्या लक्षात आलं. एअर इंडियाचे हे बोइंग 787-8 ड्रीमलायनर विमान होतं. हाँगकाँगवरुन दिल्लीला जाण्यासाठी या विमानाने उड्डाण केलं होतं. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने माघारी परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. हा तांत्रिक बिघाड काय आहे? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. मागच्या आठवड्यात अहमदाबाद एअरपोर्टरुन उड्डाण केलेलं एअर इंडियाच विमान काही मिनिटात कोसळलं. यात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. ज्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं. तिथल्या 24 शिकाऊ डॉक्टरांचा मृत्यू झाला. या भीषण हवाई दुर्घटनेने देशाला हादरवून सोडलय.
याआधी हैदराबादला चाललेल्या लुफ्थांसाच्या एका विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. पण लँडिंग क्लियरन्स न मिळाल्यामुळे यू-टर्न घेऊन हे विमान पुन्हा जर्मनी के फ्रँकफर्ट एअरपोर्टच्या दिशेने परतलं. फ्लाइट LH752 फ्रँकफर्टवरुन रवाना झालेलं.सोमवारी सकाळी हे विमान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार होतं. पण अर्ध्यावाटेतूनच विमानाला माघारी फिरावं लागलं.
लुफ्थांसा एअरलाइन्सने काय म्हटलं?
आम्हाला हैदराबाद येथे उतरण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून विमान यू-टर्न घेऊन पुन्हा माघारी फिरलं असं ANI ने लुफ्थांसा एअरलाइन्सच्या हवाल्याने म्हटलं आहे. विमानाच्या अचानक डायवर्जनने प्रश्न निर्माण झाले. एअरलाइन्सने लँडिंग क्लियरन्स न मिळाल्याचा हवाला दिला. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी यासाठी बॉम्बची धमकी कारणीभूत असल्याच सांगितलं.
लोकांच्या मनात संताप
अहमदाबाद येथे बोइंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळलं. त्यामुळे लोकांच्या मनात एअर इंडियाबद्दल राग आहे. एअर इंडियाच्या विमानांचा मेन्टेनस, वैमानिकांची ट्रेनिंग यावर लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. अनेक लोकांनी सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये बदल आणि व्यवस्थापनचा उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी केली आहे.