AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित डोवाल मॉस्कोत काय करतायेत? अमेरिकेचे राजदूतही आल्याची माहिती

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा रशिया दौरा अशा वेळी सुरू आहे जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याची धमकी दिली आहे.

अजित डोवाल मॉस्कोत काय करतायेत? अमेरिकेचे राजदूतही आल्याची माहिती
Ajit Doval Moscow
| Edited By: | Updated on: Aug 06, 2025 | 5:02 PM
Share

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल रशियाच्या दौऱ्यावर असून, बुधवारी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत भारत-रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, तेल निर्बंध तसेच राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीवर चर्चा होणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ हेही मॉस्कोत दाखल झाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या तेल खरेदीमुळे भारतीय आयातीवरील 25 टक्के शुल्कात लक्षणीय वाढ करण्याची घोषणा केली असतानाच भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रशियाचा दौरा करत आहेत. गेल्या महिन्याच्या अखेरीस ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती, जी 7 ऑगस्टपासून लागू होत आहे.

S-400 बद्दल बोलता येईल

रशियाची सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत भूराजकीय परिस्थितीतील सध्याच्या तणावावरही चर्चा होणार आहे. याशिवाय रशियाकडून भारताला होणाऱ्या तेलपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असेल.

संरक्षण सहकार्यावरही चर्चा होणार असून, या दरम्यान अजित डोवाल रशियाकडून उर्वरित S-400 क्षेपणास्त्र प्रणालीपुरवठ्याबाबत बोलू शकतात. जगातील सर्वात यशस्वी आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षणांपैकी एक असलेल्या रशियाच्या S-400 ने मे महिन्यात भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ऑपरेशन सिंदूरनंतरचा पहिला रशिया दौरा

मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय एनएसए पहिल्यांदाच रशियाच्या दौऱ्यावर येत आहे. अजित डोभाल यांचा दौरा काही आठवडे आधीच नियोजित असला तरी ते अमेरिकेसोबतचा ताज्या शुल्कतणाव आणि अमेरिकेच्या धमक्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असून रशियाच्या युद्धयंत्राला इंधन देत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. वॉशिंग्टन स्वत: मॉस्कोकडून युरेनियम आणि खते खरेदी करत असताना भारताने अमेरिकेची टीका अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचे राजदूतही मॉस्कोत दाखल

दरम्यान, मॉस्कोच्या आणखी एका हायप्रोफाईल भेटीमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. बुधवारी अजित डोवाल रशियन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत, तेव्हा ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ हेही मॉस्कोत दाखल झाले आहेत. क्रेमलिनने मंगळवारी त्यांच्या दौऱ्याची माहिती दिली. व्हिटकॉफ यांच्या दौऱ्याची घोषणा करताना पुतिन यांचे सहकारी दिमित्री पेशकोव्ह म्हणाले की, तज्ज्ञ पातळीवरील चर्चेनंतर पुतिन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटण्यास तयार आहेत. मात्र, या बैठकीची कोणतीही कालमर्यादा त्यांनी स्पष्ट केली नाही.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा