AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

All Eyes On Rafah ला कोट्यवधी लोकांचं समर्थन, कोणी केली होती सुरूवात ?

इन्स्टाग्रामवर सुमारे 5 कोटी वेळा शेअर करण्यात आलेल्या All Eyes On Rafah या पोस्टची सुरूवात कोणी केली हा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली. इस्रायलचं नेमकं काय चाललंय हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

All Eyes On Rafah  ला कोट्यवधी लोकांचं समर्थन, कोणी केली होती सुरूवात ?
| Updated on: May 31, 2024 | 12:10 PM
Share

All Eyes On Rafah ही सोशल मीडियावरील अशी स्टोरी आहे जी आत्तापर्यंत बहुतांशी युजर्सनी पाहिली असेल. जगातील नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया युजर्सनी ही पोस्ट आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये ठेवली. जगभरात सुमारे 5 कोटींहून अधिकवेळा ही स्टोरी शेअर करण्यात आली. इस्रायलच्या रफाहवरील एअर स्ट्राइकमध्ये 45 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. AI जनरेटेड ‘ऑल आइज ऑन रफाह’ च्या पोस्टमधून इस्रायलच्या अमानवीय कृत्याकडे जगाच लक्ष वेधलं जातंय. मोठ्या प्रमाणात ही पोस्ट शेअर करण्यात आली. या फोटोमध्ये नेमक काय होत की ती इतके वेळा शेअर झाली?. ही पोस्ट नेमकी कोणी बनवली आणि त्या मागाचा नेमका हेतू काय ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या पोस्टमध्ये काही तंबू दिसत होते, त्यावर मोठ्या अक्षरात All Eyes On Rafah असं लिहीण्यात आलं. हा फोटो मलेशियाच्या एका इन्स्टा यूजरने, shahv4012 याने AIच्या सहाय्याने बनवला होता. इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केल्यानंतर मंगळवारी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. मात्र तो फोटो शेअर झाला आणि त्या ट्रेंडने बघताबघता असा वेग पकडला की मलेशियातून तो जगभरात पसरला. त्याला काऊंटर करण्यासाठी , विरोध करण्यासाठी इस्रायलच्या समर्थकांनीही अनेक ट्रेंड चालवण्याचा प्रयत्न केला.

इतका शेअर का होतोय हा फोटो ?

गाझामध्ये होत असलेल्या घटनांकडे लक्ष वेधून घेणं एवढाच या ट्रेंडचा अर्थ नाही. जसजसे जास्तीत जास्त लोकं ही पोस्ट शेअर करतील तसे लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि राफाहमध्ये काय होतंय याचा विचार लोक करू लागतील. सोशल मीडियाच्या या युगात पाश्चात्य मीडियाच्या अजेंड्याला विरोध करण्यासाठी असे ट्रेंड प्रभावी ठरतील, असे मत तज्ज्ञांनी मांडले.

कोण आहे यूजर shahv4012?

यूजर shahv4012 याच्याबद्दल सध्या खूप माहिती उपलब्ध नाही, पण त्याच्या इन्स्टा अकाऊंटवरीन मिळालेल्या माहितीनुसार, तो मलेशियन नागरिक असून त्याला फोटोग्राफीची आवड आहे.

इस्रायलने रफाहवर एअर स्ट्राइक केला. त्यात अनेक निष्पाप, निपराध नागरिक लहान मुलं, महिला यांना आपले प्राण गमवावे लागले. हमासच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करणं हा या स्ट्राइकमागे उद्देश असल्याच इस्रायलकडून सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात निष्पाप जीव मारले गेले. म्हणून ‘ऑल आइज ऑन रफाह’ नावाने ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.