जगाला उडवण्याची या मुस्लिम राष्ट्राची थेट धमकी, म्हणाले, आमच्याकडे हात पुढे केले तर कधीही..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम फक्त अमेरिकेपुरताच मर्यादित राहिला नाही तर जगावर देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे परिणाम होताना दिसतात. डोनाल्ड ट्रम्प यांना आता थेट एक देशाने मोठी धमकी दिली असून ज्यामुळे संपूर्ण जग अडचणीत आलंय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव प्रचंड वाढल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर इराणवर थेट हल्ला करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराणमध्ये सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू होते. यादरम्यान आंदोलकांना पाठिंबा देताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. यासोबतच सरकारने इराणमधील सत्ता 40 दिवसात सोडावी नाही तर आम्ही हल्ला करू असे त्यांनी म्हटले. इराणनेही स्पष्ट केले की, आमच्या घरातील मुद्द्यांमध्ये कोणी हस्तक्षेप करत असेल तर आम्ही त्या व्यक्तीचे हात तोडून टाकू. इराण आणि अमेरिकेत मोठा तणाव वाढल्याचे बघायला मिळाले.
अमेरिका कधीही हल्ला करू शकते, अशी भिती लोकांमध्ये होती. मात्र, अमेरिकेने इराणवर हल्ला करण्यापासून एक पाऊस मागे टाकल्याचे जगाने बघितले. आता इराणने जगाचे टेन्शन वाढवणारे विधान केले आहे. इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वेाच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सोडणार नाहीत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनेई यांना 40 दिवसात सरकार संपवण्याचे आदेश दिले होते. यावर बोलताना जनरल अबुलफजल शेखर यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की, आमच्या नेत्याविरोधात त्यांनी जर हात पुढे केला तर त्यांचे हात कापले जातील आणि संपूर्ण जगाला आम्ही आग लावू. इराणच्या या धमकीने जगात मोठी खळबळ उडाल्याचे सध्या बघायला मिळतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना म्हटले होते की, खामेनेई एक बीमार व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या देशाला व्यवस्थित चालवले पाहिजे आणि लोकांच्या होणाऱ्या हत्या थांबवल्या पाहिजेत. हेच नाही तर यादरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणमधील नेतृत्व बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतरच जनरल शेखरची ही धमकी पुढे आली.
