Afghanistan Crisis : अमेरिकेने आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून बाहेर काढलं, 31 ऑगस्टपर्यंतचा प्लॅन काय?

अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या आपल्या मोहिमेचा वेग वाढवलाय. अफगाणिस्‍तानमध्ये तालिबानच्या ताब्यानंतर आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय.

Afghanistan Crisis : अमेरिकेने आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून बाहेर काढलं, 31 ऑगस्टपर्यंतचा प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:01 AM

काबुल : अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या आपल्या मोहिमेचा वेग वाढवलाय. अफगाणिस्तानमधून मागील 24 तासात जवळपास 19 हजार लोकांना एअरलिफ्ट करण्यात आलं आहे, अशी माहिती पेंटागनमधील अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलीय. अमेरिकन सैन्याचे मेजर जनरल विलियम हँक टेलर म्हणाले, “अफगाणिस्‍तानमध्ये तालिबानच्या ताब्यानंतर आतापर्यंत 88 हजार लोकांना काबुलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय.”

“अमेरिकेच्या मोहिमेत आतापर्यंत कोणताही बदल नाही”

मेजर जनरल विलियम हँक टेलर म्हणाले, “आमच्या मिशनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही सध्या अमेरिकेच्या अध्यक्षांचे आणि संरक्षण सचिवांच्या आदेशाचे पालन करत आहोत. अफगाणिस्‍तानच्या काबुल एअरपोर्टवर अमेरिकेचे सैनिक सुरक्षा व्‍यवस्‍था सांभाळत आहेत. तेथे कडेकोट सुरक्षा आहे. 20 ऑगस्टनंतर अमेरिका आणि युरोपीयन मोहिमेत जवळपास 10,000 अफगाणी नागरिकांनाही बाहेर पडण्यास मदत करण्यात आलीय.”

मदत कार्य केवळ 31 ऑगस्टपर्यंतच चालणार

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले, “अफगाणिस्तानची राजधानी काबुलहून अमेरिकी आणि इतर हजारो लोकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याचं कठिण काम वेगान सुरू आहे.” असं असलं तरी बायडन यांनी हे मदत कार्य केवळ 31 ऑगस्टपर्यंतच चालणार असल्याचं स्पष्ट केलं. याला कोणतीही मुदतवाढ नसेल हेही नमूद केलं.

पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी अफगाणमधील मदत मोहिमेचा आराखडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका अफगाणमधील अमेरिकन सैन्य, संसाधनं आणि उपकरणांना प्राधान्य देणार आहे. शक्य तितक्या जास्त गोष्टी संरक्षित करण्यावर अमेरिकेचा भर असणार आहे.

हेही वाचा :

Afghanistan Crisis : ‘तालिबानच्या प्रत्येक कृतीवर अमेरिकेची करडी नजर’, 31 ऑगस्टपर्यंत अफणगाणिस्तानातून अमेरिकेची पूर्णपणे माघार

आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये

‘काबुलमध्ये युक्रेनी विमानाचं अपहरण’, रशियन मीडियाचा दावा

व्हिडीओ पाहा :

America airlift evacuated total 88 thousand people from Kabul airport Afghanistan amid Taliban takeover

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.