AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काबुलमध्ये युक्रेनी विमानाचं अपहरण’, रशियन मीडियाचा दावा

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमध्ये (Kabul) युक्रेनच्या (Ukraine) एका विमानाचं अपहरण झाल्याचं वृत्त रशियाच्या माध्यमांनी दिलंय. आऊटलेट इंटरफेक्सने म्हटलं की युक्रेनने मात्र त्यांच्या कोणत्याही विमानाचं अफगाणिस्तानमध्ये अपहरण झालं नसल्याचा दावा केलाय.

'काबुलमध्ये युक्रेनी विमानाचं अपहरण', रशियन मीडियाचा दावा
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 8:03 PM
Share

काबुल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलमध्ये (Kabul) युक्रेनच्या (Ukraine) एका विमानाचं अपहरण झाल्याचं वृत्त रशियाच्या माध्यमांनी दिलंय. आऊटलेट इंटरफेक्सने म्हटलं की युक्रेनने मात्र त्यांच्या कोणत्याही विमानाचं अफगाणिस्तानमध्ये अपहरण झालं नसल्याचा दावा केलाय. दुसरीकडे युक्रेनचे उप परराष्ट्रमंत्री येवगेनी येनिन (Yevgeny Yenin) यांनी मंगळवारी (24 ऑगस्ट) विमान अपहरणाचा दावा केला होता. ते म्हणाले, “मागील रविवारी (22 ऑगस्ट) काही लोकांनी आमचं विमान हायजॅक केलं. अपहरण करणारे युक्रेनी नागरिकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी इराणला घेऊन गेले. युक्रेनचे नागरिकांना वाचवण्याचे 3 प्रयत्न अपयशी ठरलेत. कारण युक्रेनचं विमान काबुल विमानतळापर्यंत पोहचूच शकलं नाही.”

अपहरण झालेल्या विमानात काही लोक शस्त्रास्त्र घेऊन आल्याची माहिती युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. असं असलं तरी त्यांनी हे विमान परत आणण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले, त्या विमानातील नागरिक पुन्हा युक्रेनला परत कसे आले आणि या प्रवाशांना आणण्यासाठी दुसरं विमान पाठवण्यात आलं होतं का? या प्रश्नांची येनिन यांनी उत्तरं दिलेली नाहीत. येनिन यांनी केवळ परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा (Dmitry Kuleba) यांच्या नेतृत्वात पूर्ण आठवडाभर काम करत असल्याचं म्हटलं.

अफगाणमध्ये अडकेले 100 युक्रेनी घरवापसीच्या प्रतिक्षेत

रविवारी 31 युक्रेनी नागरिकांसह 83 प्रवाशांना घेऊन एक सैन्य विमान अफगाणिस्तानमधून कीव येथे पोहचलं. युक्रेनच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या विमानात 12 युक्रेनी सैनिकांची घरवापसी झालीय. याशिवाय परदेशी पत्रकार आणि मदत मागणाऱ्या इतर लोकांनाही बाहेर काढण्यात आलंय. याशिवाय युक्रेनचे 100 नागरिक अद्यापही अफगाणमध्ये अडकलेले आहेत.

इराणकडूनही युक्रेनी विमानाच्या अपहरणाच्या वृत्ताचं खंडण

इराणने (Iran) युक्रेनच्या दाव्याचं खंडण केलंय. त्यांनी सांगितलं की युक्रेनी विमान रात्री मशहदमध्ये इंधन भरण्यासाठी थांबलं आणि पुन्हा युक्रेनला रवाना झालं. आता हे विमान किव येथे उतरलंय.

हेही वाचा :

आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये

अफगाणिस्तानची पॉप स्टार आर्यना सईदने भारताचे मानले आभार, पाकिस्तानवर आगपाखड

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानमध्ये तालिबानच नाही, तर ISIS चाही धोका, जगातील बलाढ्य NATO सैन्यानेही गुडघे टेकले?

व्हिडीओ पाहा :

Ukraine claims hijack of evacuation plane from Kabul Afghanistan

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.