अमेरिकेत मध्यरात्री गदारोळ, ट्रंपनी वॉशिंग्टनच्या रस्त्यावर उतरवली फौज, पण का ?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये 800 नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले आहेत, गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असले तरी त्यांनी हे निर्देश दिलेत. पण त्यांनी असं का केलं ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वॉशिंग्टन डीसीमध्ये 800 नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचे आदेश दिले. आदेश येताच, मध्यरात्री सैन्याने मोर्चा ताब्यात घेतला. यापैकी काही शेकडो सैनिक रस्त्यावर दिसतील, तर काही प्रशासन आणि लॉजिस्टिक्सचं काम पाहतील. पण डोनाल्ड ट्रंप यांनी अचानक हा निर्णय का घेतला आणि यामुळे अमेरिकेत गोंधळ का माजला आहे? जाणून घेऊया.
मनोरंजक गोष्ट अशी आहे की, वॉशिंग्टन डीसीमध्ये गुन्हेगारी पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचं आकडेवारी सांगत्ये. मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या मते, 2024 साली मध्ये हिंसक गुन्हेगारी 35% ने कमी झाली, तर एफबीआयने देखील 9% ने घट झाल्याचे नोंदवलं. तर 2025 सालच्या सुरूवातीला सुरुवातीला दरोडे 25% आणि खून 12 टक्क्यांनी कमी झाले. म्हणजे एकंदर परिस्थिती सुधारत होती, पण तरीही ट्रंप यांनी रस्त्यावर फौज उतरवली.
छोटीशी गोष्ट नाहीये
तसं पहायला गेलं तर नॅशनल गार्ड अशा प्रकारे रस्त्यावर उतरवणं ही काही छोटी गोष्ट नाही. अमेरिकेत, ही फोर्स सहसा आपत्ती, मोठे दंगली किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित परिस्थितीत तैनात केली जाते. आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यावेळी वॉशिंग्टन डीसीमध्ये काही मोठ्या प्रमाणात दंगल झाली नाही किंवा गुन्हेगारीचा दरही विक्रमी पातळीवर नव्हता. खरंतर आकडेवारी वेगळंच काही सांगत आहे.
का उतरवली फौज ?
डोनालस्ड ट्रंप यांचं असं म्हणणं आहे की ट्रम्प गँग्सचा कब्जा संपवणं आणि राजधानी सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. येथे यापूर्वीही नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले होते. 2020 साली जेव्हा पोलिस आणि निदर्शकांमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता तेव्हा ट्रंप यांच्या प्रशासनाने ब्लॅक लाईव्हज मॅटर निदर्शनांच्या वेळी शेकडो रक्षक तैनात केले होते. तर 2021 साली कॅपिटव हिल्स येथे झालेल्या दंगलीनंतर सुरक्षेसाठी हजारो नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले होते. 1968 मध्ये मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांच्या हत्येनंतर डीसीमध्ये हिंसाचार उसळला तेव्हा गार्ड रस्त्यावर उतरले होते. पण फरक इतकाच आहे की या सर्व वेळी, त्या प्रसंगी परिस्थिती खरोखरच नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र आता, यावेळी परिस्थिती सामान्य दिसत आहे, तरी 800 सैनिकांना उतरवणे अनेकांसाठी धक्कादायक आहे.
