AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मोठा निर्णय, भारताला कोरोना लसींचा पुरवठा?

गेल्यावर्षी जगभरात कोरोनाची साथ आली तेव्हा अमेरिकेने लसनिर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांशी करार करुन लसींचा मोठा साठा आपल्याकडे राहील, याची तजवीज केली होती. | Coronavirus vaccine America

मोठी बातमी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मोठा निर्णय, भारताला कोरोना लसींचा पुरवठा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन
| Updated on: Apr 28, 2021 | 7:36 AM
Share

वॉशिंग्टन: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकटाशी दोन हात करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी अमेरिका धावून येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकारपरिषदेत तसे संकेत दिले आहेत. यापूर्वी अमेरिकेने भारताला कोविशील्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता अमेरिका भारताला थेट लसींचा पुरवठा करण्याच्या विचारात आहेत. (America may provide Covid 19 vaccines to India)

गेल्यावर्षी जगभरात कोरोनाची साथ आली तेव्हा अमेरिकेने लसनिर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्यांशी करार करुन लसींचा मोठा साठा आपल्याकडे राहील, याची तजवीज केली होती. त्यानंतर आतापर्यंत अमेरिकेत बऱ्यापैकी लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे अमेरिका कोरोना लसींचा अतिरिक्त साठा इतर देशांना देण्याचा विचार करत आहे. यामध्ये अमेरिका भारताचा प्राधान्याने विचार करत असल्याचे समजते.

गेल्यावर्षी अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले होते तेव्हा भारतानेच अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करुन दिला होता. त्या मदतीची आता अमेरिकेकडून परतफेड होण्याची शक्यता आहे. याशिवाय, अमेरिका भारताला रेमडेसिविरसह इतर औषधे आणि लसी तयार करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रांचे सुटे भागही देणार असल्याचे समजते.

अमेरिकेचीही ‘मास्कमुक्ती’कडे वाटचाल

इस्रायलनंतर अमेरिकेनेही मास्कमुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. देशात कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, तसेच ज्या लोकांपासून इतरांना संसर्गाचा धोका आहे, अशा लोकांसाठी अमेरिकेत प्राधान्याने कोरोना लसीकरण पूर्णत्वास नेले जात आहे.

विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहिमेत विशेष खबरदारी घेतली जात आहे. या मोहिमेला चांगले यश मिळू लागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता लस टोचून घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर मास्कशिवाय फिरण्यास मुभा दिली आहे.

संबंधित बातम्या:

बायडन- मोदींची फोनवर चर्चा, अमेरिकेच्या संरक्षण सचिवांची तातडीची बैठक, 135 कंपन्यांच्या सीईओंची भारताला मदतीची तयारी

Video: चीन म्हणतो, भारतीय लोक कोरोनाचा लवकरच पराभव करतील, कुठल्याही मदतीसाठी तयार!

NSA प्रमुख अजित डोवाल मैदानात, अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाला हिरवा कंदील, नेमकं काय घडलं?

(America may provide Covid 19 vaccines to India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.