अखेर अमेरिका झुकली… नाकेबंदी हटवणार; इराणचा होर्मुझबाबत मोठा निर्णय काय? संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी बातमी

Hormuz Strait News : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. अशातच आता अमेरिकेने इराणवरील नौदल नाकेबंदी हटवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अखेर अमेरिका झुकली... नाकेबंदी हटवणार; इराणचा होर्मुझबाबत मोठा निर्णय काय? संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारी बातमी
US vs Iran Deal about to Final
Image Credit source: Google
| Updated on: May 27, 2026 | 7:37 PM

गेल्या काही काळापासून इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झालेला आहे. अशातच आता या युद्धाबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने इराणवरील नौदल नाकेबंदी हटवण्याची तयारी दर्शवली आहे. त्याबदल्यात इराण होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यास तयार आहे असा दावा इराणच्या सरकारी टीव्हीने केला आहे. यामुळे संपू्र्ण जगाला दिलासा मिळाला आहे. कारण यामुळे विस्कळित झालेला जागतिक तेल पुरवढा सुरळित होणार आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील देशांना मोठा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कराराचा मसुदा काय?

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. आता हे युद्ध संपण्याची शक्यता आहे. इराणच्या सरकारी टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्राथमिक आणि अनधिकृत सामंजस्य कराराचा मसुदा इराणला मिळाला आहे. या मसुद्यानुसार, इराण एका महिन्याच्या आत होर्मुज सामुद्रधुनीतील व्यावसायिक जहाजांची वाहतूक युद्धपूर्व स्थितीत आणेल. त्याबदल्यात अमेरिका इराणच्या आसपासच्या भागातून आपले सैन्य मागे घेईल आणि नौदल नाकेबंदी समाप्त करेल.

इराण सावध पावले उचलणार

मात्र, या मसुद्यात अमेरिकन युद्धनौकांच्या तैनातीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर होर्मुज सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीचे व्यवस्थापन इराण आणि ओमान यांनी संयुक्तपणे करावे या मुद्द्यावर अजून एकमत झालेले नाही. आता इराणने स्पष्ट केले आहे की, कोणतीही ठोस पडताळणी झाल्याशिवाय आम्ही कोणतेही पाऊल उचलणार नाहीत.

दोन्ही देशांना कराराचे पालन करावे लागणार

दोन्ही देशांमधील मसुद्यात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, जर 60 दिवसांच्या आत अंतिम करार झाला तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून त्याला बंधनकारक मान्यता दिली जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही देशांना त्या कराराचे पालन करणे आवश्यक ठरेल. त्यामुळे आता दोन्ही देश यावर अंतिम निर्णय काय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, युद्धबंदीच्या चर्रेवेळी इराणने आपल्यावरील निर्बंध शिथिल करणे, जप्त केलेली मालमत्ता परत देणे आणि इराणला पुन्हा तेल निर्यात करण्याची मुभा देणे यांसारख्या मागण्या केल्याचेही समोर आले आहे. आता दोन्ही देशांमध्ये नेमका काय करार होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Follow Us