AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा करार यशस्वी होताच भारत होणार मालामाल, भारतीय अर्थव्यवस्था मारेल जोरदार मुसंडी, रशियाने…

अमेरिकेने भारतावर लावलेल्या मोठ्या टॅरिफनंतर मोठी खळबळ उडाली. आता त्यामध्येच भारताने होणारी व्यापार तूट भरून काढण्यासाठी मोठी योजना आखली आहे. रशियासोबत भारताने व्यापार वाढवण्यास सुरूवात केली.

हा करार यशस्वी होताच भारत होणार मालामाल, भारतीय अर्थव्यवस्था मारेल जोरदार मुसंडी, रशियाने...
India Russia Trade
| Updated on: Oct 13, 2025 | 3:34 PM
Share

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावत सर्वांनाच मोठा धक्का दिला. अमेरिकेने लावलेलया टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावात आल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका भारतासाठी मोठा व्यापार भागीदार होता. मात्र, टॅरिफ लावल्यानंतर भारतातून अमेरिकेत होणारी जवळपास 70 टक्के निर्यात बंद आहे. निर्यात बंद झाल्याने याचा तोटा फक्त भारतालाच नाही तर अमेरिकेला देखील सहन करावा लागतोय. अमेरिकेत देखील वस्तूंचे भाव गगणाला पोहोचली आहेत. भारत नुकसान टाळण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न  करत आहे. भारताने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर काही देशांसोबत मुक्त करार केला. भारत-अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील बंद आहे.

टॅरिफनंतर होणारे नुकसान भरून काढण्यासाठी एक मास्टर प्लॅन नुकताच सरकारकडून केला जातोय. भारताला रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा केला जातोय. मात्र,टॅरिफनंतर व्यापारी तूट $59 अब्जपर्यंत पोहोचली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारत हे नॉन-टेरिफ अडथळे दूर करण्यासाठी रशियाशी चर्चा करत आहे. बहुतेक समस्या कृषी आणि सागरी उत्पादनांशी संबंधित आहेत.

रशियाने भारतीय आंबा आणि केळीच्या जातींना मान्यता दिली आहे. मात्र, कोळंबी निर्यातीसाठी भारतीय कंपन्यांना रशियाची मान्यता ही एक मोठी चिंता आहे. 2024-25 मध्ये भारताची रशियाला एकूण निर्यात 4.88 अब्ज डॉलर्स होती, त्यापैकी 123 दशलक्ष डॉलर्सची निर्यात कोळंबी आणि लॉबस्टरची होती. भारताला रशियासोबत 59 अब्ज डॉलर्सच्या व्यापारी तूटचा सामना करावा लागत असल्याने, हे नॉन-टॅरिफ अडथळे त्वरीत दूर करणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

फक्त नोंदणीकृत कंपन्याच रशियाला कोळंबी निर्यात करू शकतात. याव्यतिरिक्त, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान आणि आर्मेनिया यांचा समावेश असलेला युरेशियन इकॉनॉमिक युनियन भारतासोबत व्यापार करार अंतिम करत आहे. हा करार झाला तर भारताचे होणारे नुकसान आणि व्यापार तूट भरून काढण्यास अत्यंत मोठी मदत होईल. रशिया हा अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारताला तेलाच्या किंमतीमध्ये मोठी सूट देताना दिसत आहे.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...