Israel-Iran Tension : इराणच आता काही चालणार नाही, अमेरिका इस्रायलला देणार THAAD, त्यात असं काय खास?
Israel-Iran Tension : अमेरिकेकडून इस्रायलला आता THAAD सिस्टिम मिळणार आहे. यामुळे इराण आणि त्यांचे साथीदार हमास, हिज्बुल्लाहला इस्रायलच मोठ नुकसान करणं शक्य होणार नाहीय. अमेरिकेकडून इस्रायलला जी THAAD सिस्टिम मिळणार आहे, त्यात असं काय खास आहे?

अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. अमेरिकेने हे अनेकदा दाखवून दिलय. वेळोवेळी इस्रायलसाठी ते मैदानात उतरले आहेत. अमेरिका आता या आपल्या खास मित्रासाठी अजून एक गोष्ट करणार आहे. त्यामुळे इराण आणि त्यांच्या साथीदारांना इस्रायलच सुरक्षा कवच भेदणं शक्य होणार नाहीय. मागच्यावर्षी लढाई सुरु झाल्यापासून अमेरिका वेळोवेळी इस्रायलची मदत करत आलाय. इस्रायलला त्यांनी आपली अनेक घातक शस्त्र दिली आहेत. इस्रायलच्या सुरक्षेसाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे. शत्रुकडून इस्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचा अवाका वाढत चाललाय, तशी अमेरिकेकडून सुद्धा आपल्या मित्राच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जातेय. पेंटागनने इस्रायलला एडवांस एंटी मिसाइल सिस्टम (THAAD) देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये अमेरिका आपलं अतिरिक्त सैन्य तैनात करणार आहे.
अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे इराणसाठी धोक्याची घंटा आहे. कारण आमच्यावर हल्ला झाल्यास आम्ही उत्तर देणार असं इराणने म्हटलं आहे. आता इराणचा पलटवार निष्फळ करण्यासाठी अमेरिकेने पावलं उचलली आहेत. पेंटागनचे प्रमुख प्रमुख लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलमध्ये टर्मिनल हाय एल्टीट्यूड एरिया डिफेंस (THAAD) बॅटरी आणि अमेरिकन सैनिकांच्या तैनातीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इस्रायलची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. या निर्णयातून अमेरिकेची इस्रायलच्या सुरक्षेबद्दल असलेली कटिबद्धता दिसून येते.
THAAD सिस्टिमसाठी किती सैनिकांची गरज लागते?
काँग्रेसनल रिसर्च सर्विसच्या एप्रिलमधील रिपोर्ट्नुसार अमेरिकन सैन्याकडे सात THAAD बॅटऱ्या आहेत. या सिस्टिमला पॅट्रियट इंटरसेप्टर मानलं जातं. 150-200 किलोमीटर (93-124 मैल) अंतरावरुन लक्ष्याच्या दिशेने येणारे टार्गेट हवेतच उद्धवस्त करण्याची थाडची क्षमता आहे. ही एक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. थाडमुळे एका मोठ्या क्षेत्राच रक्षण करता येतं. प्रत्येक THAAD मध्ये सहा ट्रक-माउंटेड लॉन्चर, 48 इंटरसेप्टर, रेडियो आणि रडार उपकरण आहेत. त्याचं संचालन करण्यासाठी 95 सैनिकांची आवश्यकता असते.
अमेरिकेने हा निर्णय का घेतला?
एक वर्षापूर्वी अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी अमेरिकन सैन्याची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि इस्रायलच्या रक्षणासाठी मध्य पूर्वेत THAAD बॅटरी आणि अतिरिक्त पॅट्रियट बटालियन्सच्या तैनातीचे आदेश दिले होते. इस्रायलला THAAD मिळाल्याने त्यांची सुरक्षा अजून मजबूत होणार आहे. कारण इस्रायलकडे तीन प्रकारच हवाई सुरक्षा कवच आहे. पण हिजबुल्लाह, हूती आणि इराणकडून सतत हवाई हल्ले सुरु असल्यामुळे काहीवेळा सर्वच मिसाइल इंटरसेप्ट करणं शक्य होत नाहीय. म्हणजे त्यांना हवेतच संपवण जमत नाहीय.
