अमेरिकेत चार भारतीय वंशाच्या नागरिकांचा मृत्यू, 4 दिवसांपासून बेपत्ता, समोर आलेलं सत्य हैराण करणारं
अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथे झालेल्या कार अपघातात भारतीय वंशाच्या चार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिवाण कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह खडकाळ रस्त्यावर आढळले आहेत.

अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया येथे झालेल्या कार अपघातात भारतीय वंशाच्या चार ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते आणि गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर दिवाण, आशा दिवाण, शैलेश दिवाण आणि गीता दिवाण या चार जणांचे मृतदेह मार्शल काउंटीमधील एका खडकाळ रस्त्याच्या कडेला आढळले. त्यांची कार 2 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता सापडली.
मार्शल काउंटी शेरीफ माइक डोहर्टी यांनी सांगितल्यानुसार, ते न्यू यॉर्कमधील बफेलो येथून बेपत्ता झाले आणि अखेर वेस्ट व्हर्जिनियामधील माउंड्सविलेजवळ सापडले. एवढंच नाही तर, माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोतले. बचाव पथके पाच तासांहून अधिक काळ घटनास्थळी होती… अशी माहिती देखील समोर येत आहे. बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली.
न्यू यॉर्क राज्याच्या गव्हर्नर कॅथी होचुल यांच्या कार्यालयातील आशियाई अमेरिकन आणि पॅसिफिक आयलंडर अफेयर्सचे संचालक सिबू नायर यांनी शनिवारी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याची माहिती दिली.
त्यांनी लिहिले की दिवाण कुटुंबातील सदस्य आमच्या समुदायाचे प्रिय सदस्य होते आणि मंगळवारी पिट्सबर्ग मंदिराला भेट दिल्यानंतर ते परतले नाही. सीसीटीव्ही फुटेजनुसार, त्यांना शेवटचे पेनसिल्व्हेनियातील एरी येथील एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये पाहण्यात आलं.
शेवटचे 22 मिनिटं होती सर्वात वाईट
सिबू नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते हलक्या हिरव्या रंगाची कार चालवत होते आणि शेवटचे त्यांना माउंड्सविले येथील पॅलेस लॉज हॉटेलकडे जाताना दिसले. एवढंच नाही तर, त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया…” असं देखील नायर म्हणाले.
त्यांना शोधण्यासाठी कोणी मदत केली?
मार्शल आणि ओहायो काउंटीच्या अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम राबवली होती. कौन्सिल ऑफ हेरिटेज अँड आर्ट्स ऑफ इंडिया नावाच्या संस्थेनेही त्यांना शोधण्यात मदत केली.
