America: नशीब असावं तर असं, सहा आकड्यांनी बदलला खेळ, एका रात्रीत अब्जाधीश

America: नशीब असावं तर असं, सहा आकड्यांनी बदलला खेळ, एका रात्रीत अब्जाधीश

अमेरिकेतील मिशीगनमधील एका व्यक्तींच आयुष्य एका रात्रीतलॉटरी तिकीट जिंकल्यानं बदललं आहे. (American lottery winner )

Yuvraj Jadhav

|

Jan 23, 2021 | 6:45 PM

न्यूयार्क: अमेरिकेतील मिशीगनमधील एका व्यक्तींच आयुष्य एका रात्रीत बदललं आहे. लॉटरी तिकीट लागल्यानं तो व्यक्ती अब्जाधीश झाला. शुक्रवार (22 जानेवारी) ला एका व्यक्तीनं एक बिलीयन डॉलर म्हणजेच 7 हजार 300 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. लॉटरीचे आयोजन करणाऱ्या संस्थेने सांगितल्यानुसार ही त्या व्यक्तीनं जिंकलेली लॉटरी मेगा मिलीयन्स जॅकपॉटमधील सर्वाधिक किमंतीची लॉटरी होती. मेगा मिलीयन्स जॅकपॉट कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार विजेत्या व्यक्तीनं खरेदी केलेल्या लॉटरीचा नंबर 4,26,42,50,60 आणि 24 लॉटरी तिकीटांशी जुळत होता. अखेर त्या व्यक्तीनं एक बिलियन डॉलरची रक्कम जिंकली. (America1 billion dollar mega millions jackpot lottery winner from Michigan)

लॉटरी आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या व्यक्तीनं लॉटरीमध्ये जिंकलेली रक्कम कोणत्या प्रकारे स्वीकारणार याची माहिती दिलेली नाही. लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीनं दीर्घकालीन मुदतीत रक्कम स्वीकारण्याचा पर्याय स्वीकारल्यास 5 हजार 400 कोटी रक्कम मिळेल. 2016 नंतर एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी लागण्याची ही तिसरी वेळ आहे.

2018 मध्ये 11 हजार कोटी जिंकले

अमेरिकेत सर्वाधिक रकमेची लॉटरी जिंकण्याचं रेकॉर्ड टेनेसी,फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियामधील तीन लोकांच्या नावावर आहे. त्यांनी जवळपा 1.586 बिलीयन डॉलर म्हणजेत 11 हजार कोटी रुपये जिंकले होते. तर, वैयक्तिक 1.537 बिलीयन डॉलर 2018 मध्ये एका व्यक्तीनं जिंकले होते. सप्टेंबर 2020 नंतर लॉटरीची रक्कम वाढली जात आहे.

कोरोना महामारी

लॉटरीमधून होणाऱ्या कमाईची रक्कम कोरोनामुळे कमी केली जात आहे. कोरोनानंतर बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे लोक त्यांचे पैसे जीवनावश्यक वस्तूंवर खर्च करत आहेत. मेगा मिलीयन्स जॅकपॉट अमेरिकेतील 45 राज्यांमध्ये उपलब्ध आहे. अमेरिकेमधील लास वेगास शहरात लॉटरी आणि कॅसिनो व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो.

भारतात न विकलेल्या तिकीटातून धनलाभ, 46 वर्षांच्या शरफुद्दीनचं नशीब पालटलं

दरवर्षी भारतापासून दुबईपर्यंत आणि सिंगापूरपासून बँकॉकपर्यंत अनेक देशातील नागरिकांना लॉटरीमुळे ‘छप्पर फाड के’ लाभ होतात. तामिळनाडूत राहणारे 46 वर्षांचे शरफुद्दीन इतरांचं नशीब चमकवण्याचं काम करत असत. शरफुद्दीन केरळ सरकारच्या लॉटरीची विक्री करत असत. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त आयोजित लॉटरीची काही तिकीटं विकली गेली नव्हती. लॉटरीचा निकाल जाहीर झाला, त्यावेळी शरफुद्दीन यांच्याकडे एक तिकीट होतं. नेमकं यामध्येच जॅकपॉट लपला होता. त्यामुळे न विकलेल्या तिकीटाच्या 12 कोटींच्या बक्षिसाचा धनी शरफुद्दीन झाला.

संबंधित बातम्या:

कर्जबाजारी शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी

दुबईत भारतीयाचं नशीब फळफळलं, बिग तिकिट ‘ड्रॉ’मध्ये तब्बल 24 कोटी रुपये जिंकले

(America1 billion dollar mega millions jackpot lottery winner from Michigan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें