Corona | एक संपला नाही, की आला दुसरा! फ्रान्समध्ये आढळला ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य कोरोना वेरीएंट

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jan 04, 2022 | 5:04 PM

आफ्रिकेतील कॅमेरुन येऊन प्रवास करुन फ्रान्समध्येल आलेल्याला या नव्या IHU वेरीएंटची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 12 जणांना या नव्या विषाणूची बाधा झाली आहे.

Corona | एक संपला नाही, की आला दुसरा! फ्रान्समध्ये आढळला ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य कोरोना वेरीएंट

कोरोनाच्या रोज नवनव्या वेरीएंटमुळे (New Variant) संपूर्ण जग धास्तावलं आहे. मुंबई (Mumbai Corona), महाराष्ट्रासह (Maharashtra Corona) संपूर्ण देशात ओमिक्रॉन (Omicron) वेरिएंटचा कहर सुरु झाला आहे. प्रशासनानंही त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कडक निर्बंध, नाईट कर्फ्यू आणि विकेंट कर्फ्यूसारख्या (Curfew) गोष्टींची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. या सगळ्या धाकधुकीत आता फ्रान्समध्ये (France) ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य असा कोरोनाचा नवा व्हेरीएंट आढळल्याचा दावा केला जातो आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनपेक्षाही अधिक वेगानं हा नवा वेरिएंट म्युयेट होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

नव्या वेरीएंटचं नाव काय?

कोरोनाच्या या नव्या आणि जास्त संसर्गजन्य असलेल्या या वेरीएंटचं नाव आहे. IHU (B.1.640.2). फ्रान्समधील आयएचयू मेडिटेरनी इन्फेक्शन इन्स्टिट्यूनं केलेल्या अभ्यासात या अधिक गंभीर आणि वेगानं पसरणाऱ्या नव्या वेरीएंटचा शोध लावला आहे. ओमिक्रॉनच्या तुलनेत हा नवा वेरीएंट तब्बल 46 पट जास्त संसर्गजन्स आहे. ओमिक्रॉन वेरीएंटपेक्षा नव्या वेरीएंटमध्ये 46+ म्युटेशन्स असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

किती जणांना लागण?

आफ्रिकेतील कॅमेरुन येथून प्रवास करुन फ्रान्समध्येल आलेल्याला या नव्या IHU वेरीएंटची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 12 जणांना या नव्या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या ओमिक्रॉनमुळे संपूर्ण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ढग अधिक गडद होत असतानाच आता फ्रान्समध्ये आणखी एका नव्या वेरीएंटच्या शोधानं सगळेच धास्तावले आहे.

अद्याप पुष्टी झालेली नाही!

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं फ्रान्समध्ये आढळून आलेल्या या नव्या वेरीएंटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. फ्रान्सव्यतिरीक्त इतर कोणत्याही देशात हा विषाणू अजूनतरी आढळून आलेला नाही. सध्याच्या घडला भारतातली ओमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढते आहे. आतापर्यंत भारतासह शंभरहून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भारतासह जगातील सगळ्यांच देशांनी पुन्हा एकद कडक निर्बंध आणि नियमावली जारी करत संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीची पावलं उचललेली आहेत.

इतर बातम्या –

Omicron | घाबरवणाऱ्या ओमिक्रॉनवर दिलासादायक संशोधन, नव्या विषाणूशी लढणार शरीरातील खास घटक

Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्था’वर कोरोनाची एन्ट्री, घरातील कर्मचाऱ्याला लागण

Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची अक्षरशः उसळी; काय स्थिती, घ्या जाणून…


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI