AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War Update : युद्धात बॅकफूटवर ढकलल्या गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आली अखेर चांगली बातमी, भारताचा सुद्धा फायदा

Iran War Update : इराण विरुद्ध युद्ध सुरु केल्यापासून अमेरिका दिवसेंदिवस बॅकफुटवरच जात आहे. हे युद्ध कधीपर्यंत थांबणार त्याची चिन्हच दिसत नाहीय. अमेरिकेने जे धोरण, उद्दिष्टय डोळ्यासमोर ठेऊन हे सुरु केलेलं. ते पूर्ण होताना दिसत नाहीय. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

Iran War Update : युद्धात बॅकफूटवर ढकलल्या गेलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आली अखेर चांगली बातमी, भारताचा सुद्धा फायदा
Donald Trump
| Updated on: Mar 23, 2026 | 10:23 AM
Share

अमेरिका-इस्रायलने सुरु केलेल्या युद्धामुळे इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद केलय. इथून जाणाऱ्या काही जहाजांवर इराणने हल्ले केलेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज बंद असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड चिडले आहेत. त्यांनी थेट इराणला 48 तासांची धमकी दिली आहे. हॉर्मुज स्ट्रेट जगातील व्यस्ततम तेल मार्गांपैकी एक आहे. जगातील 20 टक्के तेलाची या मार्गावरुन वाहतूक होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्य देशांना मदतीचं आवाहन केलं होतं. या दरम्यान नाटोचे सरचिटणीस मार्क रुट म्हणाले की, “स्ट्रेट ऑफ होर्मुज पुन्हा खुलं करण्यासाठी जगातील अन्य देश प्रयत्न करत नाहीयत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नाराज आहेत”

मार्क रुट म्हणाले की, “या आठवड्यात मी अनेक वेळा ट्रम्प यांच्याशी बोललो. मित्र देशांनी हा महत्वाचा समुद्री मार्ग सुरक्षित बनवण्यासाठी जास्त सक्रीय भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा आहे” फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत रुट म्हणाले की, “परिस्थिती आता बदलत आहे. 20 पेक्षा जास्त देश शिपिंग चॅनलचं कामकाच सुनिश्चित करण्यासाठी त्यांचं विजन लागू करण्यासाठी एकत्र येत आहेत”

तो इराणच्या रणनितीचा भाग

ट्रम्प यांच्या दबावाचा परिणाम दिसू लागला आहे असा रुट यांनी दावा केला. आंतरराष्ट्रीय समुदाय या जागतिक संकटावर मात करण्यासाठी जास्त जबाबदारी उचलण्यासाठी तयार दिसतोय. रुट यांच्या मते मित्र देशांना एकत्र आणणं, या मिशनच्या यशासाठी आवश्यक आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील महत्वाच्या तेल मार्गांपैकी एक आहे. इराणने त्यांच्या रणनितीचा भाग म्हणून हॉर्मुज स्ट्रेट बंद करुन ठेवलं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज खुला झाल्यास त्यात भारताचाही फायदाच आहे.

इराणवरील हल्ल्यांचं समर्थन

इराणवर अमेरिकेकडून सुरु असलेल्या हल्ल्यांचं नाटो प्रमुखांनी समर्थन केलय. जागतिक सुरक्षेसाठी हे पाऊल महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. इराणचा अणवस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रम जगासाठी धोकादायक आहे असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय शांतता टिकवून ठेवण्यासाठी या संकटाचा सामना करणं आवश्यक आहे असे नाटो प्रमुख म्हणाले. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने सुरु केलेलं युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. सुरुवात परस्परांच्या लष्करी ठिकाणांना टार्गेट करण्यापासून झाली होती. पण आता ही लढाई ऊर्जा युद्धामध्ये बदलू लागली आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!