Iran-Israel War : इराणसोबत युद्ध सुरु असताना इस्रायलने भारताची माफी का मागितली?
Iran-Israel War : भारत आणि इस्रायलमध्ये अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. वर्ष 2017 मध्ये इस्रायलचा दौरा करणारे नरेंद्र मोदी भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारत इस्रायलचा मोठा व्यापारी भागीदार आहे. इस्रायलकडून सैन्य साहित्य विकत घेणाऱ्या मोठ्या ग्राहकांपैकी भारत एक आहे. इस्रायलने जी चूक केली, त्यासाठी 90 मिनिटात त्यांनी भारताची माफी मागितली.

सध्या इस्रायलची इराणसोबत लढाई सुरु आहे. मागच्या दोन दिवसात दोन्ही देशांनी परस्परांवर प्रचंड मोठे हल्ले केले आहेत. इस्रायलने या ऑपरेशनला रायजिंग लायन नाव दिलं आहे, तर इराणने आपल्या प्रतिहल्ल्याच्या कारवाईला ‘ट्रू प्रॉमिस 3’ नाव दिलं आहे. हे सगळं इतक्यात थांबणार नसल्याची चिन्ह आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. इस्त्रायल-इराणमध्ये ही लढाई सुरु असताना इस्रायलने भारताची माफी मागितली आहे. इराणसोबत युद्ध लढत असताना भारताची माफी मागण्याच कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. इस्रायलने भारताचा चुकीचा नकाशा दाखवला त्या बद्दल माफी मागितली आहे. इस्रायलने X वर पोस्ट करुन आपली चूक कबूल केली. “हा नकाशा अचूक भारतीय सीमा दाखवू शकला नाही. आमच्यामुळे जो काही त्रास झाला, त्याबद्दल क्षमा असावी” असं IDF ने पोस्टमध्ये म्हटलय.
इस्रायलने नकाशाचा फोटो शेअर करताना कॅप्शन दिली होती. “इराण एक जागतिक धोका आहे. आम्ही त्यांचं शेवटच टार्गेट नाही, ही तर सुरुवात आहे. आमच्यासमोर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही” असं लिहिलेलं. या नकाशामध्ये इराणला मध्यभागी दाखवण्यात आलं होतं. त्यात इराणच्या मिसाइल्सची 300 किमी, 500 किमी, 800 किमी, 1300 किमी आणि 2000 किलोमीटर अशी मिसाइल्सची रेंज दाखवण्यात आली होती. मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका, दक्षिण आशिया आणि युरोपचे काही भाग इराणच्या मिसाइलच्या टप्प्यात येत असल्याच दाखवण्यात आलं होतं.
इस्रायलने काय चूक केलेली?
इराणच्या मिसाइल्सपासून फक्त इस्रायललाच नाही, तर तो एक जागतिक धोका आहे, असं फोटोच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला. पण यात मोठी चूक म्हणजे भारताचा नकाशा चुकीचा दाखवला होता. नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाखला वगळलेलं होतं. हे दोन्ही भाग भारताचे अविभाज्य अंग आहेत. लडाखचा भाग असलेला अकसाई चीनला सुद्धा भारताच्या भागातून वगळण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं होतं. या चुकीच्या नकाशासाठी इस्रायलने माफी मागितली आहे.
Iran is a global threat.
Israel is not the end goal, it’s only the beginning. We had no other choice but to act. pic.twitter.com/PDEaaixA3c
— Israel Defense Forces (@IDF) June 13, 2025
अजून मोठ्या प्रमाणात हल्ले होऊ शकतात
इस्रायलने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी इराणच्या अणवस्त्र तळांवर आणि सैन्य ठिकाणांवर हल्ले केले. इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी म्हणून इस्रालयने ही कारवाई केली. यात इराणच प्रचंड नुकसान झालं. अणवस्त्र विकासाबरोबर त्यांची बॅलेस्टिक मिसाइल उत्पादनाची क्षमता कमी झाली. त्यांचे बरेच बडे लष्करी अधिकारी मारले गेले. इस्रायलचा हा हल्ला म्हणजे इराणसाठी मोठा झटका आहे. त्याला काल रात्री इराणने बॅलेस्टिक मिसाइलद्वारे उत्तर दिलं. पण आता इस्रायलकडून इराणवर अजून मोठ्या प्रमाणात हल्ले होऊ शकतात.