AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पायलटने आकाशात विमानाचे इंजिन बंद करण्याचा केला प्रयत्न, कारण ऐकाल तर हैराण व्हाल

एफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानूसार रविवारी अलास्का एअरलाईनचे विमान उडत असताना एका ऑफ ड्यूटी पायलटने अचानक विमानाचे इंजिनच बंद करण्याचा प्रयत्न केला. काय आहे नेमकी घटना पाहा

पायलटने आकाशात विमानाचे इंजिन बंद करण्याचा केला प्रयत्न, कारण ऐकाल तर हैराण व्हाल
AIR PLANE Image Credit source: socialmedia
| Updated on: Oct 25, 2023 | 6:02 PM
Share

न्यूयॉर्क | 25 ऑक्टोबर 2023 : विमान हजारो फूट उंचीवरुन उडत असताना अलास्का एअरलाईन्सच्या एका विमानातील प्रवाशांचे प्राण अचानक संकटात आले. कारण या विमानातील एका ऑफ ड्यूटी पायलट अचानक विमानाचे इंजिन बंद करायला सरसावला. मात्र, वेळीच सावध झालेल्या अन्य पायलटनी त्याला खेचून कॉकपिटमधून बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. या विमानाचे पोर्टलॅंडमध्ये सुरक्षित आपात्कालिन लॅंडींग करण्यात आल्यानंतर पायलटवर 83 प्रवाशांची हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानूसार रविवारी अलास्का एअरलाईनचे विमान उडत असताना एका ऑफ ड्यूटी पायलटने अचानक विमानाचे इंजिनच बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सह पायलटनी या जोसेफ इमर्सन ( 44 ) नावाच्या पायलटला पकडून कॉकपिटमधून खेचून बाहेर काढले. पोर्टलॅंडमध्ये या विमानाचे आपात्कालिन लॅंडींग करण्यात आले. त्यानंतर पायलट इमर्सनवर 83 प्रवाशांच्या हत्येच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. मंगळवारी कोर्टातील कारवाईनंतर असे सांगण्यात आले की या पायलट नर्व्हस ब्रेकडाऊन झाला होता. त्याने मॅजिक मशरुम खाल्ली होती. त्यामुळे त्याला हा त्रास झाला.

अशा प्रकारच्या घटना याआधी देखील झाल्या आहेत. विमानाला हवेत असताना पाडण्याचा प्रयत्न याआधी देखील झाला आहे. यापूर्वी मार्च 2015 मध्ये बार्सिलोना ते डसेलडोर्फला जाणाऱ्या जर्मनविंग्स विमानाच्या एका पायलटने विमान जाणीवपूर्वक दुर्घटनाग्रस्त केले होते. या अपघातात प्रवासी आणि चालक दलाचे सहा सदस्यांसह 150 जणांचा मृत्यू झाला होता.

मला वाटले की स्वप्न पहात आहे – इमर्सन

पोलिसांच्या चौकशीत आरोपी पायलट इमर्सन याने सांगितले की तो सलग 40 तास झोपला नव्हता. हे विमान लॅंड होत असताना त्याने विमानाच्या पाठच्या बाजूचा आपात्कालिन दरवाजाही उघडण्याचा प्रयत्न केला होता. परंतू केबिन क्रुने त्याला वेळीच अडविले. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात पायलट इमर्सन याने पोलिसांना सांगितले की मी दोन्ही इमर्जन्सी शटऑफ हॅंडलना खाली खेचले कारण मला वाटले मी स्वप्न पाहात आहे आणि मला केवळ जागे होण्याची इच्छा आहे.

मशरुम आणि नर्व्हस ब्रेकडाऊन

पायलट इमर्सन याने सायकेडेलिक मशरुमच्या बाबत सांगितले की त्याने पहिल्यांदाच अशी मशरुम खाल्ली होती. मंगळवारी कोर्टात झालेल्या सुनावणीत पायलट इमर्सन याने या आरोपांसाठी त्याला दोषी ठरवू नये अशी विनंती कोर्टाला केली आहे. अलास्का एअरलाइनने इमर्सनला अनिश्चित काळासाठी सेवेतून काढले असून सर्व कर्तव्यातून मुक्त केले आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.