Massive Blast in Havana : क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट; पंचतारांकित हॉटेलमध्ये 22 जणांचा मृत्यू

वरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट क्युबासाठी मोठा आर्थिक फटका ठरू शकतो. कारण कोरोना साथीनंतर आता क्युबातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशात हा स्फोट घडल्यानं पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते.

Massive Blast in Havana : क्युबाची राजधानी हवानात भीषण स्फोट; पंचतारांकित हॉटेलमध्ये 22 जणांचा मृत्यू
भीषण स्फोट Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 6:07 PM

नवी दिल्ली : क्युबाची राजधानी हवाना (Havana) येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री भीषण स्फोट झाला. साराटोगा (Hotel Saratoga) असे या हॉटेलचे नाव आहे. त्यानंतर स्फोटाच्या ठिकाणाहून धूळ आणि धुराचे लोट बाहेर पडत होते. त्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. सुरक्षा दलांनी या हॉटेलला वेढा घातला असून आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर या भीषण स्फोटात 70 जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार हॉटेलमधील गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे कळत आहे. यानंतर राष्ट्राध्यक्ष मिगेल डायझ (President Miguel Diaz) आणि त्यांचे अनेक मंत्री घटनास्थळी पोहोचले आहेत.

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता

तर घटनास्थळी दाखल होते राष्ट्राध्यक्षांनी घटनेचा सविस्तर आढावा घेतला. तसेच बचाव कार्याला वेग देण्याच्या त्यांनी सुचना केल्या आहेत. हवानाचे सचिव लुईस अँटोनियो यांनी सांगितलं की, आम्हाला ढिगाऱ्याखाली काही मृतदेह आढळून आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अद्याप अडकले असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मिळालेले सर्व पुरावे हे अपघात झाल्याचेच निर्देश करतात. स्फोट एवढा जोरदार होता की रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या वाहनांना आणि लोकांनाही त्याचा तडाखा बसला.

गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट

तर न्यूयॉर्क पोस्टने सूत्रांनी म्हटलं की, द्रवरूप गॅस टँकरमधून गॅस सिलिंडरमध्ये भरत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट क्युबासाठी मोठा आर्थिक फटका ठरू शकतो. कारण कोरोना साथीनंतर आता क्युबातील पर्यटन क्षेत्राला वेग आला आहे. अशात हा स्फोट घडल्यानं पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते. तसेच अमेरिकेच्या निर्बंधांमुळे येथील अर्थव्यवस्था आधीच वाईट स्थितीतून जात आहेत. त्याचबरोबर क्युबामध्ये सरकारच्या विरोधात अनेक निदर्शनं झाली आहेत.

हे सुद्धा वाचा

मीडियाला जाऊ दिले नाही

‘न्यू कॅलिफोर्निया’ टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, साराटोगा हॉटेल हे राजधानीतील प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक आहे आणि या हॉटेलला अनेकदा परदेशी पर्यटक भेट देतात. सरकारच्या पत्रकार परिषदाही अनेकदा येथेच होतात. हॉटेलच्या वेबसाइटवरही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. या भागात मीडियाला प्रवेश दिला जात नाही. घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका हजर आहेत. या हॉटेलजवळ एक प्रसिद्ध शाळाही आहे. ती रिकामी करण्यात आली आहे.

1930 मध्ये बांधले गेले साराटोगा हॉटेल

हे पंचतारांकित हॉटेल असून त्यात 96 खोल्या आहेत. दोन बार, दोन रेस्टॉरंट आणि छतावरील पूल देखील आहेत. हे हॉटेल 1930 मध्ये बांधले गेले होते. हे हेरिटेज क्लासिक क्यूबन मॉडेल असल्याचे म्हटले जाते. 2005 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले आणि नंतर उघडले.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.