Ukraine Russia War : झेलेन्स्कींना मारण्याचे प्रयत्न, एका आठवड्यात तिनदा मारण्याचा डाव, ब्रिटनच्या माध्यमांचा खळबळजनक दावा

ब्रिटनमधील माध्यमांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना एका आठवड्यात तिनदा मारण्याचे प्रयत्न झाल्याचा हा मोठा दावा आहे. त्यामुळे जगभरात खळबळ माजली असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. युद्ध न करण्याचा आणि चर्चेनं प्रश्न सोडवण्याचा सल्ला यापूर्वी भारतानं रशियाला दिला आहे. मात्र, अद्यापही रशियानं छेडलेलं युद्ध काही संपण्याचं नाव घेत नाहीये.

Ukraine Russia War : झेलेन्स्कींना मारण्याचे प्रयत्न, एका आठवड्यात तिनदा मारण्याचा डाव, ब्रिटनच्या माध्यमांचा खळबळजनक दावा
युक्रेन रशियासोबत चर्चेसाठी तयार Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 6:19 PM

कीव : युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध (Ukraine Russia War) सुरु असून युक्रेनमधील (Ukraine) अनेक भागांना रशियानं लक्ष्य केलं आहे. रोज रशियाकडून (Russia) युक्रेनच्या वेगवेगळ्या आणि विशेषत: महत्वाच्या भागांवर हल्ले केले जात असल्यानं युक्रेनला प्रत्येक क्षणाला सतर्क रहावं लागत आहे. अनेक महत्वाच्या ठिकाणांवर रशियानं हल्ले केले असल्यानं युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे.  यातच आता ब्रिटनमधील माध्यमांकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांना एका आठवड्यात तिनदा मारण्याचे प्रयत्न झाल्याचा हा मोठा दावा आहे. त्यामुळे जगभरात खळबळ माजली असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. युद्ध न करण्याचा आणि चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला यापूर्वी भारतानं रशियाला दिला आहे. मात्र, अद्यापही रशियानं छेडलेलं युद्ध काही संपण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे दिवसागणिक युक्रेनमधील नागरिकांच्या अडचणी वाढतायेत.

ब्रिटनच्या माध्यामांचा खळबळजनक दावा

ब्रिटनच्या ‘द टाईम्स’ने केलेल्या दाव्यानुसार युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या हत्येचा कट होता. 24 फेब्रुवारीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनच्या विरोधात युद्धाला सुरुवात केली. यानंतर युक्रेन आणि रशियामधील युद्ध अद्यापही सुरु आहे. यानंतर युक्रेनमधील दोन प्रतांना रशियानं स्वतंत्र केलं. वेगवेगळ्या भागात रशियानं हल्ले घडवून आणले असून युक्रेनचे अनेक शहरं रशियानं बेचिराख केले आहेत. यातच आता ब्रिटनच्या मीडियानं नवा दावा केल्यानं झेलेन्स्की यांच्या सुरक्षेविषयी जगभरात चर्चा सुरु झाली आहे. कारण, युक्रेन ही अफगाणची पुनरावृत्ती आहे. अफगाणमध्ये देखील तालिबान्यांनी एक एक भाग काबीज केला होता. यामुळे अफगाणिस्तानच्या प्रमुखांना देश सोडून पळावं लागलं होतं. आता तीच पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जगभरातील बलाढ्य देशांनी प्रयत्न करायला हवेत.

हत्येचा प्रयत्न कुणी केला?

ब्रिटनमधील ‘द टाईम्स’ने केलेल्या दाव्यानुसार, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना मारण्यासाठी भाडोतरी लोक पाठवण्यात आले आहेत. हे लोक वैगनर समुहाचे असून रशियाच्या एका विशेष बलाचे आहेत. ब्रिटनच्या माध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न रुसी फेडरल सेक्युरिटी ब्यूरोच्या मदतीनं व्यर्थ गेल्या आहे. रुसी फेडरल सेक्युरिटी ब्यूरो झेलेन्स्की यांना मारण्याच्या विरोधात असल्याचा दावाही ब्रिटनच्या माध्यमानं केलाय.

झेलेन्स्कींकडून यापूर्वी हत्येचे संकेत

यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या हत्येचा कट असल्याचा दावा केला होता. कीवमध्ये 400 लोक हत्या करण्यासाठी पाठवण्यात आल्याचं झेलेन्स्की यांनी सांगीतलं होतं. झेलेन्स्की यांच्या सुरक्षेविषयी तेव्हापासून युक्रेन सतर्क असल्याचं बोललं जात आहे. झेलेन्स्की यांनी यापूर्वी देश सोडण्याचा सल्ला एका मोठ्या राष्ट्रानं दिला होता. तरी देखील झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडला नाही. ते आजही आपल्या देशासोबत लढतायेत. मात्र, ब्रिटनच्या माध्यमांनी केलेला दावा खळबळजनक असून युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत पुन्ह एकदा चर्चा रंगली आहे. युक्रेनवर दिवसागणिक संकट वाढतंय. युद्धामुळे युक्रेनच्या नागरिकांना रोज आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे.

संबंधित बातम्या

युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला, कीवमधील ऑईल डेपोलाही केलं लक्ष्य, युद्धाचे ढग गडद

Russia Ukraine War : पुतीन यांची हत्या केली पाहिजे, अमेरिकन सिनेटरच्या वक्तव्याने खळबळ

Indians In Ukraine : गोळी लागलेल्या जखमी भारतीय तरुणाचा व्हिडिओ, मदतीची याचना ऐका मायबाप सरकार

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.