AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kazakhstan Plane Crash : अरे देवा, धावपट्टी अगदी टप्प्यात… अझरबैजानचे विमान कोसळले क्षणात, हादरवणारी दृश्याने काळजाचा उडेल थरकाप, Video…

Kazakhstan-Azerbaijan Airlines Plane Crash : कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ प्रवाशी विमान कोसळले. या विमानात 105 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. धावपट्टीवर उतरण्याच्या तयारी असतानाच हे विमान कोसळले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Kazakhstan Plane Crash : अरे देवा, धावपट्टी अगदी टप्प्यात... अझरबैजानचे विमान कोसळले क्षणात, हादरवणारी दृश्याने काळजाचा उडेल थरकाप, Video...
कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ अपघात
| Updated on: Dec 25, 2024 | 2:14 PM
Share

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळा जवळ अझरबैजान या देशाचे विमान कोसळले. अपघात घडला, त्यावेळी विमानात 105 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. रशियातील वृत्तसंस्थांनी या अपघाताचा खुलासा केला. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयानुसार, अझरबैजानचे विमान बाकू येथून ग्रोन्जी येथे जात होते. विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच ही दुर्घटना घडली.

अन् पाहता पाहता विमान कोसळले…

हे विमान, धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसत आहे. हे विमान इतके तिरपे झालेले दिसते की ते जणू थेट जमिनीवर येऊन आदळेल. पण थोड्याच वेळात ते उतरत असताना धावपट्टीजवळ जमिनीवर येऊन आपटले. त्याचवेळी मोठा आवाज झाला. मोठ्या आवाजाने रहिवाशी किंचाळत असल्याचा आवाज येतो. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे या दृश्यात दिसते.

विमानात 105 प्रवासी

ग्रोन्जी हे रशियातील चेचन्या या प्रदेशात येते. दाट धुकं असल्याने वेळेवर हे विमान ग्रोन्जी विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. टेंगरीन्यूज पोर्टलने या विमान अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही ट्विटर हँडलवर या दुर्घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. या विमानात 105 प्रवासी असल्याचे समोर येत आहे. तर 5 विमान कर्मचारी असल्याची एक माहिती समोर येत आहे. या प्रवाशांमध्ये अझरबैजान आणि रशियाचे नागरीक होते.

अझरबैजान एअरलाईन्सने या अपघातसंबंधी माहिती दिली आहे. त्यानुसार, हे अँम्बेअर 190 विमान होते. त्याचा क्रमांक J2-8243 असा होता. बाकू ते ग्रॉन्जी या शहरादरम्यान त्याची सेवा होती. पण दाट धुक्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ते अकातूकडे वळवण्यात आले. अकातू विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, विमानतळाच्य तीन किलोमीटर परिसरात ते कोसळले.

जमिनीवर कोसळताच आग

हे विमान, धावपट्टीच्या अगदी जवळ होते. त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. हे विमान उतरत असताना अचानक थेट जमिनीकडे येताना या व्हिडिओत दिसत आहे. विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात ते कोसळले. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे दिसते.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.