या देशाने चक्क पाकिस्तानकडून खरेदी केली फायटर जेट, युजर म्हणाले जरा चांगल्या ठिकाणाहून तरी घ्यायचीत..
आपला शेजारी असलेल्या पाकिस्तानने आता फायटर जेटचा विक्रीचा व्यवहार केल्याने अनेकांची भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्ताने आपले फायटर जेट एका देशाला विकल्याने या सौद्याकडे आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांचे देखील लक्ष गेले आहे.
JF17 Block III : आर्थिक संकटात असलेला आपला शेजारील देश पाकिस्तान आता विमान देखील विकू लागला आहे. पूर्व युरोपीय आणि आशिया स्थित मुस्लीम बहुल देश अझरबैजानने पाकिस्तानकडून JF-17 ब्लॉक III लढाऊ विमाने खरेदी केली आहेत. अझरबैजान या देशाने ही विमान खरेदी केल्यानंतर तो जगातला तिसरा असा देश बनला आहे ज्याने ही विमाने आपल्या संरक्षण कार्यक्रमात सामील केली आहेत. या पूर्वी इराकने देखील JF-17 ब्लॉक III लढाऊ विमानांना खरेदी करुन आपल्या ताफ्यात सामील केली होती.
पाकिस्तानने अझरबैजानशी JF-17 ब्लॉक III लढाऊ विमानांचा खरेदी करार केला असून त्याची अंदाजित किंमत 1.6 बिलियन डॉलर इतकी आहे. यात विमानांसह शस्रास्रे आणि प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव आहे. या कराराने दक्षिण आशियाई आणि युरोपीयन संरक्षण तज्ज्ञांना धक्का बसला असून त्यांनी देखील याची दखल घेतली आहे. कारण हे पाऊल भारत आणि त्याचे सहकारी देशांच्या दृष्टीने सामरिक दृष्ट्या महत्वाचे असू शकते.
युजरच्या प्रतिक्रीया
काही युजरने या खरेदी करारावर टीका करीत जर खरेदी करायची होती तर जर चांगल्या ठिकाणाहून तरी खरेदी करायची असे म्हटले आहे. तर काही जणांनी पाहा पाकिस्तान विमाने देखील विकू लागला आहे. आणि भारत अजून इंजिन-इंजिन करीत बसला आहे.
चीनची मेहरबानी
JF-17 ब्लॉक III ही लढाऊ विमाने पाकिस्तानच्या एयरोनॉटिकल कॉम्प्लेक्स आणि चीनच्या चेंगदू एयरक्राफ्ट इंडस्ट्री ग्रुप द्वारा संयुक्त रूपाने विकसित करण्यात आलेली आहेत. हे विमान एक हलके सिंगल इंजिन असणारे जेट फायटर विमान आहे. हे विमान एव्हीयोनिक्स, एक्टीव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड एरे (AESA) रडार, लांबपल्ल्याच्या क्षेपणास्रांनी सुसज्ज आहे. ते हवेतू हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ल्यासाठी खास डीझाईन केलेले आहे. हे विमान मध्यम आणि कमी उंचीवर प्रभावीपणे उड्डाण करू शकते. याची खास वैशिष्ट्ये या विमानाला बहुपयोगी लढाऊ विमान बनवितात. जे आधुनिक युद्धात विविध अर्थाने फायदेशीर ठरते. भारताकडे याआधीच प्रगत राफेल आणि सुखोई सारखी लढाऊ विमाने आहेत. यामुळे या विमानापासून आपल्याला कोणताही धोका नसल्याचे म्हटले जात आहे.