baba vanga prediction : डोनाल्ड ट्रम्पविषयी खरी होणार ती भविष्यवाणी? बाबा वेंगाच्या त्या दाव्याने कोणाची उडणार झोप?
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात मोठी उलथापालथ सुरू आहे. त्यांच्या टॅरिफ वॉरमुळे अनेक देश धास्तावले आहेत. त्यातच बाबा वेंगाने केलेले ते भाकीत सत्य तर ठरणार नाही ना? याची चर्चा सुरू झाली आहे.

बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिने अनेक भाकीतं केली आहेत. 9/11 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, राजकुमारी डायना हिचा मृत्यू यासारख्या घटनांची भविष्यवाणी तिने कित्येक दशकांपूर्वी करून ठेवली होती. तिने कवितेच्या रुपात या घटनांचे गूढ शब्दात वर्णन केले आहे. त्याचा अर्थ या घटना घडल्यावर सहज लागला. बाबा वेंगाने 2025-26 हे आर्थिक वर्ष मोठे आर्थिक संकट घेऊन येईल असे भाकीत केले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगात मोठी उलथापालथ सुरू आहे. त्यांच्या टॅरिफ वॉरमुळे अनेक देश धास्तावले आहेत. त्यातच बाबा वेंगाने केलेले ते भाकीत सत्य तर ठरणार नाही ना? याची चर्चा सुरू झाली आहे.
मित्र म्हणत मोठा फटका
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांसोबत नवीन व्यापारी करार केले आहेत. त्यांच्यावर 20 टक्के ते पार 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ पण लावला आहे. ब्राझील आणि भारत या देशांवर ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ आणि दंडाची रक्कम सुद्धा लादली आहे. ट्रम्प भारताला अमेरिकेचा सर्वात विश्वासू मित्र म्हणत होते. पण त्यांनी या मित्रावर 50 टक्के टॅरिफच लावला नाही तर रशियाकडून इंधन खरेदी केल्यावर दंड लावण्याची धमकी पण दिली आहे. यामुळे भारतापुढे काही आव्हानं उभी ठाकू शकतात.
ब्रिक्स देशांवर ट्रम्प यांची मोठी नाराजी
ब्रिक्स संघटनेतील देशांवर ट्रम्प यांची सर्वात मोठी नाराजी आहे. ते या संघटनेवर आणि सदस्य देशावर सतत आगपाखड करत असतात. त्यांनी अनेकदा या देशांच्या या आर्थिक धोरणांवर आणि व्यापारी घडामोडींवर टीका केली आहे. ट्रम्प यांची धोरण ही सध्याच्या व्यापारीक धोरणांना आणि सौहार्दपूर्ण वातावरणाला बिघडवण्याचे, अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत उद्रेक
बाबा वेंगा हिच्या भाकितानुसार, अमेरिकेत असा मनुष्य येईल जो जगाला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो कर लादण्याचा प्रयत्न करेल. यामुळे अनेक देशातील व्यवहारांवर परिणाम होईल. पण त्याची ही कृती त्याच्यावर पण उलटेल. आता ही भविष्यवाणी खरं ठरणार का, असा सवाल करण्यात येत आहे. अनेक जण अमेरिकेची ही दडपशाही आणि दंडेलशाही अधिक काळ टिकणार नाही असे सांगत आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे तिथली अर्थव्यवस्था पण प्रभावित होईल आणि महागाई भडकेल असा दावा अनेक तज्ज्ञ करत आहेत. त्याचा मोठा फटका ट्रम्प यांना बसू शकतो.
डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. टीव्ही 9 त्याला दुजोरा देत नाही.
