AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकरच महासंकट? समुद्रातला तो दरवाजा खुलणार? बाबा वेंगाच्या नव्या अवताराची मोठी भविष्यवाणी!

Baba Vanga Predictions : एक नवी आणि जगाला चिंतेत टाकणारी भविष्यवाणी समोर आली आहे. या भविष्यवाणीची जगभरात चर्च होत आहे.

लवकरच महासंकट? समुद्रातला तो दरवाजा खुलणार? बाबा वेंगाच्या नव्या अवताराची मोठी भविष्यवाणी!
baba vanga (मागे-सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)
| Updated on: Jun 18, 2025 | 7:17 PM
Share

Baba Vanga Predictions : बाबा वेंगा यांच्यानंतर आता जपानमधील रियो तात्सुकी यांच्या भविष्यवण्या जगाचं लक्ष वेधून घेत आहेत. रियो यांनी याआधी केलेल्या भविष्यवाणी सत्यात उतरल्या आहेत. याच रियो तात्सुकी यांनी जगाची चिंता वाढवणारी भविष्यवाणी व्यक्त केली आहे. त्यांनी समुद्रातील एक दरवाजा उखडणार आहे. त्यामुळे मोठं संकट येणार असल्याचं भविष्य व्यक्त केलंय.

जुलै महिन्यात येणार मोठं संकट

विशेष म्हणजे ही भविष्यवाणी ऐकून 83 टक्के लोकांनी जपानला जाणाऱ्या विमानांची तिकिटं रद्द केली आहेत. रियो तात्सुकी यांनी याआधी कोरोना महासाथीचं भविष्य वर्तवलं होतं. त्यांचं 90 च्या दशकातलं ‘द फ्यूचर आय सॉ’ नावाचं एक पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी येणाऱ्या जुलै महिन्यात जपानमध्ये मोठं संकट येणार असल्याचं भविष्य वर्तवलं आहे.

जपानमध्ये नेमकं काय होणार?

रियो तात्सुकी यांच्या भविष्यवाणीनुसार येत्या 5 जुलै रोजी जपान तसेच फिलीपिन्स दरम्यान समुद्राच्या तळाशी एक मोठी भेग पडणार आहे. त्यामुले तोहोकू भूकंप येणार आहे. या भूकंपामुळे समुद्रात उंच-उंच लाटा येतील, अशी भविष्यवाणी रियो तात्सुकी यांनी केलीय. या भविष्यवाणीनंतर आता लोक जुलै महिन्यात जपानला जाण्याचे टाळत आहेत. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या रिपोर्टनुसार या भविष्यवाणीची तारीख जशी-जशी जवळ येत आहे तसे तसे लोक विमानाच्या तिकिटांचं बुकिंग रद्द करत आहेत. विमान तिकिटांच्या बुकिंगचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले आहे. विशेषत: बोईंग विमानांच्या तिकीट कॅन्सलेशनचे प्रमाण हे 15 ते 20 टक्के आहे. अनेक प्रवासी हे मंगा यांच्या भविष्यवाणीमुळे विमान प्रवासाची तिकिटं रद्द करत आहेत.

अनेक भविष्यवाण्या ठरल्या खऱ्या

दरम्यान, या भविष्यवाणीची सगळीकडे चर्चा होत असली तरी मियागी प्रांताचे गव्हर्नर योशीहिरो मुराई यांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच काहीही चिंता करू नका. लोकांनी प्रवास करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. रियो तात्सुकी यांनी याआधीही अनेक मोठ्या भविष्यवाणी केलेल्या आहेत. यामध्ये मार्च 2011 च्या तोहोकू भूकंप आणि त्सुनामी, राजकुमारी डायना यांचा मृत्यू, फ्रेडी मर्करी यांचे निधन, कोरोना महासाथ यांचा समावेश आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा