Explainer : बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बडे चेहरे कोण?, स्वतंत्र बलूचिस्तान का? काय आहे इतिहास?
पाकिस्तानमधील बलूचिस्तान प्रांतात स्वातंत्र्यासाठीचे आंदोलन जोर धरत आहे. मीर यार बलूच यांनी स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर हा विषय जागतिक पातळीवर चर्चेत आला आहे. बलूच लिबरेशन आर्मी आणि इतर संघटना पाकिस्तान विरुद्ध लढा देत आहेत. मानवाधिकारांचे उल्लंघन, सांस्कृतिक दडपण आणि आर्थिक शोषण यामुळे बलूच स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.

सध्या पाकिस्तान मोठ्या संकटाचा सामना करत आहे. पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करून पाकला कायमची अद्दल घडवली आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे. तर दुसरीकडे बलूचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. महागाई, उपासमार आणि विदेशातून कर्ज घेणं या गोष्टी पाकिस्तानसाठी आधीच आव्हान ठरलेल्या आहेत. पण आता समोर असलेलं संकट त्याही पेक्षा मोठं आहे. 1971 नंतर पुन्हा एकदा देशाचे तुकडे होण्याचं संकट पाकवर आलं आहे. बलूच लीडर मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून बलूचिस्तान वेगळं झाल्याची औपचारिक घोषणा केली. अनेक दशकांपासून सुरू असलेली हिंसा, बलूच नागरिकांचं अपहरण आणि मनावाधिकाराच्या...
