AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे.

भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा थयथयाट; घेतला मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 4:56 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमावावा लागाला. यामध्ये दोन विदेशी नागरिकांचा देखील समावेश होता. तर या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत, या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच थयथयाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

भारत सरकारनं पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली आहे, तसेच पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच सिंधु पाणी वाटप कराराला देखील स्थगिती देण्यात आली आहे. अटारी बॉर्डर देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे.

भारत सरकारच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे, पाकिस्तानकडून भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच पाकिस्तानच्या बाजुची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली आहे.

मंगळवारी पहलगाममध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नाव विचारून पर्यटकांवर गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानने देखील भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे, सुरक्षादलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू असून, या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील दीड हजार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी काल जम्मू -काश्मीरमध्ये बंद पाळण्यात आला.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?